सोमवार, मे 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारू-आदित्यचा शाही लग्नसोहळा, पण समोर आलं वेगळंच सत्य, गळ्यातील मंगळसूत्रावरुन पारूने घेतलेला निर्णय अहिल्यादेवींना पटणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 18, 2024 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial New Promo

पारू-आदित्यचा शाही लग्नसोहळा, पण समोर आलं वेगळंच सत्य, गळ्यातील मंगळसूत्रावरुन पारूने घेतलेला निर्णय अहिल्यादेवींना पटणार का?

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गावाकडील पारूचा प्रवास या मालिकेत पाहायला मिळत आहे. तर अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या करारीपणा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर पारू भोवती फिरणार हे मालिकेचं कथानक साऱ्यांनी उचलून धरलं आहे. मालिकेत पारू व आदित्य यांच्यात फुलत जाणार प्रेमही पाहायला मिळत आहे. (Paaru Serial New Promo)

सध्या मालिकेत सूर्यकांत कदम व अहिल्यादेवी यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समोर आलेला प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. या प्रोमोमध्ये पारू व आदित्य यांच्यातील प्रेमाची चाहूल पाहायला मिळत आहे. सदर प्रोमो हा किर्लोस्कर कंपनीच्या ब्रँडसाठी शूट केला असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – अहिल्यादेवींवर मोठं संकट, कोलमडूनही गेल्या अन्…; सूर्यकांतला धडा शिकवत श्रीकांतची सुखरूप सुटका करणार का?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, पारू व आदित्य यांच्या शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. ब्रँडच्या शूटसाठी दोघेही वधूवराच्या रूपात तयार झालेले दिसत आहेत. यांत पारूचा पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत आहे आकर्षक दागिने, नऊवारी साडीमध्ये पारू खूपच सुंदर दिसत आहे. तरआदित्यही पारंपरिक अंदाजात उठून दिसत आहे. लग्नासाठी तयार झाल्यानंतर आदित्य पारूसमोर येताच तिला हात देताना दिसत आहे. तर त्यांनंतर त्यांचे लग्नाचे विधी पूर्ण होताना दिसत आहेत.

आणखी वाचा – सरगम मॅडमद्वारे अधिपती-अक्षराला कायमचा दूर करण्याचा भुवनेश्वरीचा प्लॅन फसणार, दोघांमध्ये फुलत आहे प्रेम, नात्याला नवं वळ

या प्रोमोमध्ये लग्न झाल्यानंतर समोरून दिग्दर्शक ओरडून सांगत आहे की, “कट, पारू तू खूप छान अभिनय केला”. त्यानंतर त्यांची टीम पारूच्या गळ्यातून हार, हातातून बांगड्या काढून घेताना दिसत आहे. आणि अगदी शेवटी पारूच्या गळ्यात मंगळसूत्र राहतं. तेव्हा कोणीतरी आवाज देत मंगळसूत्र राहिल्याचं सांगत. त्यावर पारू घाबरते आणि म्हणते की, “काही झालं तरी मी हे मंगळसूत्र काढणार नाही”. आता ब्रॅण्डसाठी केलेलं हे नाटक पारूच्या आयुष्याला कलाटणी देणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: paaru and aditya weddingpaaru serialpaaru serial new promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Munawar Faruqui news
Entertainment

स्टँड-अप कॉमेडियन तिसऱ्यांदा झाला बाबा, सोशल मीडियावर दाखविली झलक, फोटो समोर

मे 2, 2026 | 10:35 am
 Sambhavna Seth life
Entertainment

चारवेळा गर्भपात, ६५ इंजेक्शन्स आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीला झालेल्या खूप वेदना, आता ४५ व्या वर्षी होणार आई

एप्रिल 30, 2026 | 3:00 pm
sambhavna seth is pregnant
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री लवकरच होणार आई, चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 30, 2026 | 1:16 pm
 anil gawas on aastad kale
Entertainment

“फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?”, आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, “प्रेक्षक तुम्हाला…”

एप्रिल 29, 2026 | 5:16 pm
Next Post
Anil Kapoor Leaves Housefull 5

वादाची ठिणगी! अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५'मधून अनिल कपूर बाहेर, नाना पाटेकरांच्या भूमिकेवरही होणार परिणाम, भांडण की आणखी काही

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.