बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इंद्राणीला रुपालीने केलं किडनॅप, तिच्याच रक्ताने नेत्राला पाठवलं पत्र, तन्मय फाशी घेत असताना अद्वैतने बघितलं अन्…; मृत्यूचा थरार

Saurabh Moreby Saurabh More
मे 18, 2024 | 12:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi zee marathi serial update Shekhar Rajadhyaksha kidnapped Indrani

इंद्राणीला रुपालीने केलं किडनॅप, तिच्याच रक्ताने नेत्राला पाठवलं पत्र, तन्मय फाशी घेत असताना अद्वैतने बघितलं अन्...; मृत्यूचा थरार

झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’, ‘पारू’, ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ यासह ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिकाही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर त्रिनयना देवीच्या मुली हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकु, फाल्गुनी यांच्यासह राजाध्यक्ष कुटुंबातील शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केले आहे. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येक माणूस रुपाली सांगत असल्याप्रमाणे वागत असल्याचे आतापर्यंत मालिकेत पाहायला मिळाले.

अशातच मालिकेच्या कथानकात आता आणखी नवीन वळण आले आहे. नुकत्याच झालेल्या भागात रुपालीला काही नागांनी येऊन पेटीच्या बाहेर काढले. यानंतर नेत्रा, अद्वैत व इंद्राणी फोनवर बोलत असताना तन्मय इंद्राणीला फोनवर कुठेतरी बाहेर चालत असतानाचे पाहायला मिळाले. त्याच्या पाठोपाठ शेखर राजाध्यक्षही चालताना दिसतो. त्यानंतर इंद्राणी तन्मयच्या पाठीवर हात लावते. इतक्यात शेखर इंद्राणीच्या तोंडावर रुमाल धरून तिला बेशुद्ध करतात आणि मग तिला कुठेतरी डांबून ठेवतात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “त्यांच्या शेवटच्या दिवसांत…”, वडिलांच्या निधनाला तीन वर्षे होताच ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री भावुक, म्हणाली, “असा बापमाणूस…”

यानंतर डांबलेल्या ठिकाणी रुपाली व शेखर राजाध्यक्ष इंद्राणीला घेऊन जातात आणि मग रुपाली इंद्राणीच्या रक्ताने एक पत्र लिहून नेत्रा व अद्वैतला पाठवायचं ठरवतात. यानंतर मग शेखर एका तारेने इंद्राणीच्या बोटामधून रक्त काढतात आणि मग तिच्या रक्ताने लिहिलेले एक पत्र तन्मयला घेऊन नेत्रा व अद्वैतकडे पाठवतात.

आणखी वाचा – सरगम मॅडमद्वारे अधिपती-अक्षराला कायमचा दूर करण्याचा भुवनेश्वरीचा प्लॅन फसणार, दोघांमध्ये फुलत आहे प्रेम, नात्याला नवं वळण

यानंतर पुढील भागांत तन्मयने राजाध्यक्षांच्या घरात फाशी लावतानाचे पाहायला मिळाले आहे. मात्र इतक्यात अद्वैत त्याला येऊन वाचवतानाचेही पुढील भागात पाहायला मिळणर आहे. त्यामुळे आता तन्मयने घेतलेल्या फाशीमध्ये त्याचं जीव जाणार का? की अद्वैतमुळे त्याचा जीव वाचणार हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसेच इंद्राणीच्या रक्ताने पाठवेलेल्या पत्रामुळे नेत्रा-अद्वैत आता काय करणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.            

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Paaru Serial New Promo

पारू-आदित्यचा शाही लग्नसोहळा, पण समोर आलं वेगळंच सत्य, गळ्यातील मंगळसूत्रावरुन पारूने घेतलेला निर्णय अहिल्यादेवींना पटणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.