शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निर्मात्यांनी गोविंदाची फसवणूक करत पैसे दिले नाहीत अन्…; पत्नी सुनीता अहुजाचा खुलासा, म्हणाल्या, “मी माझा हक्क…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 3, 2025 | 11:27 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunita Ahuja On Govinda

निर्मात्यांनी गोविंदाची फसवणूक करत पैसे दिले नाहीत अन्…; पत्नी सुनीता अहुजाचा खुलासा, म्हणाल्या, "मी माझा हक्क…"

Sunita Ahuja On Govinda : गोविंदाची पत्नी सुनीताने पतीच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ती केवळ त्याची व्यवस्थापकच नव्हती, तर त्याचे पैशाचे व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहारही पाहत असे. गोविंदाला त्याचा हक्क मिळावा आणि त्याची कोणी फसवणूक करु नये याची पूर्ण काळजी तिने वेळोवेळी घेतली. पण गोविंदाचा कामादरम्यान खूप विश्वासघात करण्यात आला आणि सुनीताला त्याच्याशी व्यवहार करताना खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. गोविंदाची काही निर्मात्यांनी फसवणूक केल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता. सुनीताच्या म्हणण्यानुसार, तिने गोविंदाला फसवले जात असल्याचेही सांगितले होते.

सुनीताने ‘हॉटरफ्लाय’शी संवाद साधताना सांगितले की, असे अनेक निर्माते आहेत ज्यांनी गोविंदाला त्याचे पैसे दिले नाहीत आणि फसवणूक केली. सुनीता म्हणाली, “मी गोविंदाचे काम पाहत असे. मॅनेजर असल्याने मी पाहिलं आहे की लोकांनी त्याला पैसे दिले नाहीत आणि गोविंदा म्हणायचा ते जाऊ दे, त्याचा शो चांगला चालला नसावा. पण जेव्हा कधी अशी परिस्थिती उद्भवली तेव्हा मी गोविंदाला विचारायचे का?. तू डान्स केला की नाही? तू खूप मेहनत केलीस. तो तुम्हाला फसवत आहे, हे मी सांगू शकते”.

आणखी वाचा – “लग्नापूर्वीच त्याला ओळखलं असतं तर…”, शालिन भानोतबरोबरच्या तुटलेल्या लग्नाबद्दल दलजीत कौर स्पष्टच बोलली, म्हणाली, “घटस्फोटानंतरही…”

सुनीताने सांगितले की, “गोविंदा खूप भावूक आहे आणि तो इतरांवर सहज विश्वास ठेवतो”. सुनीताच्या म्हणण्यानुसार, निर्मात्यांनी गोविंदाच्या या स्वभावाचा फायदा घेतला आणि त्याला पैसे दिले नाहीत. ती म्हणाली, “तिकिटे विकली नाहीत असं मी त्याला विचारलं. यावर मी तुला २० -२५ लाख रुपये नंतर देईन असं सांगण्यात आलं. पण मी ते मान्य केले नाही आणि म्हणाले, तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? मी तिथे उभी होते आणि पाहिलं की शो हाऊसफुल्ल होता”.

आणखी वाचा – “परवापर्यंत पैसे मिळाले नव्हते आणि…”, शशांक केतकरचे बहुचर्चित वेबसीरिजच्या निर्मात्यांवर आरोप, म्हणाला, “माझ्या आवाजाऐवजी…”

सुनीताच्या म्हणण्यानुसार, तिच्या या वृत्तीमुळे तिला इंडस्ट्रीत एक वाईट व्यक्ती म्हणून पाहिले जाऊ लागले. लोक तिला चुकीचे समजू लागले. पण यामुळे सुनीताला काही फरक पडला नाही. ती म्हणाली, “त्याने मला शिव्या दिल्याने काही फरक पडला नाही. मी त्याच्यासमोर उभं राहून माझा हक्क घेईन. मी गोविंदाला त्याचे काम आणि नृत्य करण्यास सांगितलं आणि बाकीचे माझ्यावर सोडून द्यायला सांगितले”.

Tags: bollywood newsSunita Ahuja On Govindasunita ahuja statement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
shahrukh khan hide face

म्हातारपण लपवण्यासाठी शाहरुख खानचे अथक प्रयत्न, चेहऱ्या लपवताच नेटकऱ्यांनी हिणवलं, म्हणाले, "चेहऱ्यावरील सरकुत्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.