सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान खूप चर्चेत असलेला बघायला मिळत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम करताना पाहिलं आहे. संपूर्ण जगभरात त्याचे खूप चाहते आहेत. मात्र सध्या तो कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकताच तो पत्नी गौरी खान व छोटा मुलगा अबराम खानबरोबर नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या जामनगर येथील निवासस्थानी पोहोचला होता. यावेळी त्याच्या लूकबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. अशातच आता तो पार्टी करुन मुंबईला परतला आहे. यावेळीदेखील तो पत्नी व मुलाबरोबर पुन्हा एकदा एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. (shahrukh khan hide face)
काही दिवसांपूर्वी शाहरुखने चेहऱ्यावर हुडी घेतल्याने त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. अशातच आता पुन्हा एकदा त्याच्या लूकमुळेच त्याच्यावर निशाणा साधला आहे. जेव्हा शाहरुख मुंबईमध्ये परतला तेव्हा त्याच्याबरोबर त्याची मॅनेजर पूजा ददलानीदेखील दिसून आली. अभिनेत्याला सुरक्षादेखील असल्याचे बघायला मिळाले. यावेळी शाहरुखने काळ्या रंगाची हुडी परिधान केली होती. यावेळी त्याचा चेहरा पुन्हा झाकलेला बघायला मिळाला. यामुळे आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असलेली बघायला मिळाली.
शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एक नेटकरी म्हणाला की, “हा चेहऱ्यावरील सुरकुत्या तर लपवत नाही आहे ना?”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “याला असं बघून राज कुंद्राची आठवण आली”. तसेच अजून एकाने लिहिले की, “याला चेहरा दाखवायला काय समस्या आहे?”, अजून एकाने लिहिले की, “जेव्हापासून आर्यनचे प्रकरण झाले आहे तेव्हापासून तो मीडियावर नाराज आहे”.
जामनगर येथे पोहोचण्याआधी शाहरुख कुटुंबासहित अलिबागवरुन परतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखने अलिबाग येथील अलिशान फार्महाऊसवर विकेंड घालवला. यावेळी शाहरुखच्या हातात त्याचा पाळीव श्वान असलेलाही दिसत आहे. मात्र इथे त्याने हुडीमध्ये चेहरा लपवला आहे. अंबानी यांच्या पार्टीसाठी अभिनेता सलमान खानदेखील जबरदस्त परफॉर्म करताना दिसून आला होता.