Sunita Ahuja On Govinda : गोविंदाची पत्नी सुनीताने पतीच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ती केवळ त्याची व्यवस्थापकच नव्हती, तर त्याचे पैशाचे व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहारही पाहत असे. गोविंदाला त्याचा हक्क मिळावा आणि त्याची कोणी फसवणूक करु नये याची पूर्ण काळजी तिने वेळोवेळी घेतली. पण गोविंदाचा कामादरम्यान खूप विश्वासघात करण्यात आला आणि सुनीताला त्याच्याशी व्यवहार करताना खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. गोविंदाची काही निर्मात्यांनी फसवणूक केल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता. सुनीताच्या म्हणण्यानुसार, तिने गोविंदाला फसवले जात असल्याचेही सांगितले होते.
सुनीताने ‘हॉटरफ्लाय’शी संवाद साधताना सांगितले की, असे अनेक निर्माते आहेत ज्यांनी गोविंदाला त्याचे पैसे दिले नाहीत आणि फसवणूक केली. सुनीता म्हणाली, “मी गोविंदाचे काम पाहत असे. मॅनेजर असल्याने मी पाहिलं आहे की लोकांनी त्याला पैसे दिले नाहीत आणि गोविंदा म्हणायचा ते जाऊ दे, त्याचा शो चांगला चालला नसावा. पण जेव्हा कधी अशी परिस्थिती उद्भवली तेव्हा मी गोविंदाला विचारायचे का?. तू डान्स केला की नाही? तू खूप मेहनत केलीस. तो तुम्हाला फसवत आहे, हे मी सांगू शकते”.
सुनीताने सांगितले की, “गोविंदा खूप भावूक आहे आणि तो इतरांवर सहज विश्वास ठेवतो”. सुनीताच्या म्हणण्यानुसार, निर्मात्यांनी गोविंदाच्या या स्वभावाचा फायदा घेतला आणि त्याला पैसे दिले नाहीत. ती म्हणाली, “तिकिटे विकली नाहीत असं मी त्याला विचारलं. यावर मी तुला २० -२५ लाख रुपये नंतर देईन असं सांगण्यात आलं. पण मी ते मान्य केले नाही आणि म्हणाले, तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? मी तिथे उभी होते आणि पाहिलं की शो हाऊसफुल्ल होता”.
सुनीताच्या म्हणण्यानुसार, तिच्या या वृत्तीमुळे तिला इंडस्ट्रीत एक वाईट व्यक्ती म्हणून पाहिले जाऊ लागले. लोक तिला चुकीचे समजू लागले. पण यामुळे सुनीताला काही फरक पडला नाही. ती म्हणाली, “त्याने मला शिव्या दिल्याने काही फरक पडला नाही. मी त्याच्यासमोर उभं राहून माझा हक्क घेईन. मी गोविंदाला त्याचे काम आणि नृत्य करण्यास सांगितलं आणि बाकीचे माझ्यावर सोडून द्यायला सांगितले”.