Dalljiet Kaur On Shalin Bhanot : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. गेल्या वर्षी, केनियास्थित निखिल पटेलसह दुसरे लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने खूप प्रसिद्धी मिळवली. आता दलजीतने तिचा पहिला पती शालिन भानोत यांच्यापासून घटस्फोटाबाबत मौन सोडले आहे. स्क्रीनच्या डिअर मी वर, दलजीतने शालीन भानोतबरोबरचे लग्न मोडल्याबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. दलजीतने सांगितले की, ‘कुल वधू’ आणि ‘नच बलिए’ दरम्यान शालीनबरोबरचा त्यांचा तुफानी रोमान्स सुरु झाला. आणि त्यांनतर ही जोडी एकत्र अनेकदा स्पॉट होताना दिसली. दोघांच्या नात्यामुळे ते बरेच चर्चेतही राहिलेले पाहायला मिळाले.
याबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली, “‘नच बलिए’ जिंकल्यानंतर काही महिन्यांतच आम्ही लग्न केले. जर मी लग्नापूर्वीच त्याला ओळखलं असतं तर या गोष्टी आज घडल्या नसत्या”. दलजीतने पुढे सांगितले की, त्यांचे पहिले लग्न तुटल्याने त्यांच्यावर खूप भावनिक परिणाम झाला. अभिनेत्री म्हणाली, “२-३ वर्षांहून अधिक काळ मी माझे लग्न मोडल्याचे नाकारत राहिले. ‘घटस्फोट’ हा शब्द माझ्या पथ्यात बसत नव्हता. मी फक्त तुटून रडत होते. त्यावेळी जेडॉन नवजात बाळ होता. त्यामुळे हे अजिबात सोप्पे नव्हते. मी कोणत्याही रोमँटिक गोष्टींकडे जाणंही टाळलं कारण माझ्या मनात, मी घटस्फोटानंतरही विवाहित होते”.
त्यांच्या घटस्फोटानंतरच्या नऊ वर्षांमध्ये, शालिन त्यांचा मुलगा जेडेनच्या आयुष्यात तुरळकपणे गुंतला होता. तर दलजीतने जेडेनच्या कल्याणासाठी पिता-पुत्रांना भेटण्यापासून कधीही रोखले नाही. पण दलजीत म्हणते, “आज जर कोणी शालीनला जेडेनचे वय किती आहे असे विचारले तर त्याला काय उत्तर द्यायचं हे कळणार नाही”.
जेडेनच्या आयुष्यात वडिलांची अनुपस्थिती दूर करण्यासाठी दलजीतने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी दलजीत म्हणाली की, “जेडेनही माझ्या दुसऱ्या लग्नासाठी उत्सुक होता कारण त्याला वडिलांचे सुख अनुभवायचे होते. विशेषत: फादर्स डे सारख्या प्रसंगी, तो त्याच्या वडिलांसाठी तळमळलेला पाहून हृदय पिळवटून जायचे. त्याचा हा त्रास पाहून मला अयशस्वी झाल्यासारखे वाटले”. तथापि, निखिल पटेलबरोबर दलजतीचे दुसरे लग्न देखील संपुष्टात आले. आता दलजीत तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यात व्यस्त आहे आणि तिचा मुलगा जेडेनच्या संगोपनावर पूर्ण लक्ष देत आहे.