Shashank Ketkar Angry Post : बरेच असे कलाकार आहेत जे स्पष्टपणे सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतात. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे अनेकदा भाष्य करताना दिसतात. यापैकी नेहमीच स्पष्टपणे आपलं मत मांडणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक केतकरने आजवर अनेकदा स्पष्टपणे अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. बरेचदा हा अभिनेता सामाजिक मुद्द्यांवर रील व्हिडीओ पोस्ट करताना दिसतो. शशांक केतकर हा मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा आहे. त्याने आजवर अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनयाशिवाय सोशल मीडियावरील त्याच्या अनेक सामाजिक विषयांवरील व्हिडीओमुळेही चर्चेत राहत असतो.
दरम्यान, शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी पोस्ट करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शशांकने शेअर केलेल्या या स्टोरीवरुन त्याने त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. अनेकदा कलाकारांची फसवणूक होते तेव्हा ही कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे व्यक्त होतात. अशातच अभिनेता शशांक केतकरचीही एका मीडिया हाऊसकडून फसवणूक झाली असल्याचं समोर आलं आहे. गुनाह सीझन २ मध्ये काम करुनही शशांकला त्याचं मानधन मिळालं नाही, याबाबत त्याने आवाज उठवला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, शाही पध्दतीने पार पडला लग्नसोहळा, फोटो व्हायरल

“‘Gunaah season २’ आज पासून सुरु पण सीझन २ चं चित्रीकरण संपल होतं तरी सीझन २ चे पैसे परवा पर्यंत मिळाले नव्हते आणि सीझन १ चे पैसे मिळाल्या शिवाय सीझन 2 चं मी डबिंग करणार नाही अशी अट घातल्यामुळे अनेक सीनमध्ये माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्टकडून वाक्य डब करुन घेतली आहेत. लवकरच सविस्तर बोलेनच”, असं म्हणत त्याने सदर मीडिया हाऊसला टॅग करत मत मांडलं आहे.
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा शशांक मानधन न मिळाल्याने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. आजवर शशांकने त्याने अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाला सगळ्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. सध्या तो ‘मुरंबा’ या मालिकेमध्ये तो मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत आहे.