शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी मालिकेच्या निर्मात्याने पैसे थकवल्याची अभिनेत्याने केलेली पोस्ट, लगेचच मिळाले पैसे, म्हणाला, “तुमच्या पाठिंब्यामुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 22, 2024 | 5:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sukh Kalale serial Marathi actor Aashay Kulkarni shared a post about getting his due money by producer

आशय कुलकर्णीला मिळाले त्याचे थकलेले पैसे, पोस्ट शेअर करत दिली माहिती

मराठी मालिकांमधून अनेक कलाकार घराघरात पोहोचले आहेत. छोट्या पडद्यावरुन त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली. पण मालिकांत काम करणाऱ्या कलाकारांना अनेकवेळा असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक तास चालणारं शूटिंग, कामाची पद्धत, त्याचबरोबर अनेक कलाकारांना हक्काचं मानधनदेखील मिळत नाही. याबद्दल अनेक कलाकारांनी अनेकदा भाष्य केलं आहे. अशातच आता छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्याला याबद्दलचा अनुभव आला आणि हा अभिनेता म्हणजे आशय कुलकर्णी. मराठी मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच आशय कुलकर्णी. काही दिवसांपूर्वीच त्याने एका मालिकेत काम केलं होतं. परंतु, निर्मात्यांनी त्याचं मानधन अद्याप अभिनेत्याला दिलं नाही या आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली.

आशयने यासंदर्भात वारंवार फोन, ई-मेल करुनही उत्तर मिळत नसल्याचं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आशयने याबाबत संताप व्यक्त करत आपलं मत मांडलं होतं. आशयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र ही पोस्ट लिहित असताना त्याने मालिकेचं नाव घेणं टाळलं. या पोस्टद्वारे त्याने निर्मात्यांना पैसे मिळण्याबाबत प्रश्न विचारले. आशयची ही पोस्ट अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि या पोस्टमुळे त्याला त्याचे थकलेले पैसे मिळाले आहेत.

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची…’ मालिका बंद करण्याची प्रेक्षकांची मागणी, विरोचकाला परत आलेला पाहून म्हणाले, “काहीही दाखवतात आणि…”

आशयने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मिळाले! माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, हितचिंतक, तुमच्या पाठींब्यासाठी धन्यवाद”. दरम्यान, आशयने तरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा पार केला. त्या शोचे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, ईपी यांना वारंवार फोन, ईमेल केले. तरीही पैसे काही मिळाले नाही. आमच्याकडून रोज शूटला वेळेत येण्याची अपेक्षा असते, पण मग वेळेत पैसे देता का येत नाही?”. ही पोस्ट शेअर केली होती.

आणखी वाचा – “पैसे वेळेत देत नाहीत अन्…”, बहुचर्चित मराठी मालिकेच्या निर्मात्यांवर अभिनेत्याचे आरोप, नक्की मालिका कोणती?

नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेने आठशे भागांचा टप्पा पार केला. शिवाय आशयही या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत होता. त्यामुळे आशयने उल्लेख केलेली मालिका हीच असल्याची चर्चा होत आहे. मात्र सोशल मीडियावर या मालिकेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आशय सध्या सुख कळले मालिकेत काम करत आहे. आशय हा काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटात झळकला होता. तसेच त्याने झी मराठीवरील  ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेतही काम केलं आहे.

Tags: Aashay KulkarniAashay Kulkarni Marathi Newsmarathi actorMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Upcoming Episode

Paaru Marathi Serial : प्रीतम-प्रियाच्या नात्याने उलगडणार का जुनी नाती, प्रेमाची कबुली दिली पण…; काय घडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.