बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : प्रीतम-प्रियाच्या नात्याने उलगडणार का जुनी नाती, प्रेमाची कबुली दिली पण…; काय घडणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2024 | 6:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Upcoming Episode

पारू मालिकेत प्रीतम-प्रियाच्या नात्याने जुनी नाती उलगडणार

Paaru Serial Upcoming Episode : ‘पारू’ या मालिकेत सध्या रक्षाबंधन विशेष भाग पाहायला मिळत आहे. रक्षाबंधनला किर्लोस्कर घरात काम करणाऱ्या सर्व महिला या आदित्य व प्रीतमला राखी बांधतात. ही संधी साधत दामिनी पारू व प्रियालाही राखी बांधायला सांगते. मात्र प्रिया यावेळी दामिनीला सडेतोड उत्तर देत मी इथे काम करते आणि मी इथे कोणाला भाऊ बनवायला आले नाही, असं सांगून बाजूला होते. तर इकडे आता पारू समोर मोठा प्रश्न पडतो. पारूला आदित्यबरोबर भावा-बहिणीच्या बंधनात अडकवण्यासाठी दामिनीचा नवा डाव पाहायला मिळत आहे. आदित्य पारूकडून राखी बांधून घेणार की नाही हे आगामी भागात पाहणं रंजक ठरेल.

दरम्यान मालिकेत जुन्या नात्यांचा नवा अध्याय सुरु होताना पाहायला मिळणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी अहिल्या देवींनाही त्यांच्या सख्ख्या भावाची आठवण येते. त्या त्याच्या आठवणीत भावुकही होतात. दुरावलेल्या या नात्यांचा एक प्रोमोही समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळालं की अहिल्यादेवी त्यांच्या भावाला राखी पाठवतात. तर यावेळी हे देखील समोर येत की, प्रिया ही अहिल्यादेवींच्या भावाची मुलगी असते.

आणखी वाचा – वडिलांचा अपमान लेकीला सहन होईना, जान्हवीला पॅडीच्या मुलीने सुनावताच कलाकारांकडून कौतुक, म्हणाले, “शाब्बास पोरी…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तर समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम व प्रिया बोलत असतात. तेव्हा प्रीतम प्रियावरील प्रेमाची कबुली देतो. मात्र हे प्रेम प्रिया मान्य करत नाही. प्रोमोमध्ये प्रितम म्हणतो, “प्रिया मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मी आताच जाऊन आईला सगळं सांगतोय.” त्यावर प्रिया म्हणते, “थांबा प्रतिम सर, तुम्ही सांगाल अहिल्या मॅडमना. पण माझ्या आबांचं काय?” मग प्रितम विचारतो, “कोण आहेत तुमचे आबा?”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीने लाथ मारली, जान्हवी जोरात ओरडली अन्…; आर्यावर तुटून पडल्या निक्की-जान्हवी, म्हणाल्या, “ही फडफडतेय…”

तेव्हा प्रिया सांगते, “सयाजी राव भोसले. खऱ्याबरोबर नेहमी उभे राहणारे आणि खोट्याला आयुष्यात जागा न देणारे.” हे ऐकून प्रितमला आश्चर्याचा धक्काच बसतो. प्रितम व प्रियाच्या लव्हस्टोरीमुळे दुरावलेली नाती जवळ येतील की या नात्यात आणखी फूट पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: paaru marathi serialPaaru Serial Upcoming Episodeparu marathi serial new promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
23 august 2024 Friday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

23 August Horoscope : मेष, मिथुन व कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस आर्थिक खर्चाचा, आर्थिक गणित बदलणार, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.