(Satvya Mulichi Satavi Mulgi : छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या कथानकातही काही दिवसांपूर्वी असाच एक मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. यावेळी नेत्राच्या हातून देवी आईने दिलेल्या शस्त्रातून विरोचकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. नेत्राने विरोचकाचा वध केला आहे. त्यानंतर ती तिच्या जुळ्या मुलींना सोबत घेऊन पुढचं आयुष्य जगायला सुरुवात करते. मालिकेतला नवीन ट्विस्ट काही प्रेक्षकांना आवडला आहे, तर काहींना या नवीन ट्विस्टला काहींची नापसंती दर्शवली आहे. ((Satvya Mulichi Satavi Mulgi serial update)
सोशल मीडियामुळे प्रेक्षक त्यांना एखाद्या विषयावर काय वाटते हे सहज सांगू शकतात. त्याचप्रमाणे मालिकांवरदेखील ही प्रेक्षक मंडळी व्यक्त होताना दिसतात. अशातच आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचा एक नवीन प्रोमो झी मराठीने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शतग्रीव हे पात्र नेत्रा आणि तिच्या कुटुंबीयांना फसवून त्यांच्या घरात प्रवेश करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत आपले मत मांडल्याचे पाहायला मिळत आहे. अद्वैतची काकू नेत्राला विचारते, “हे सगळं काय चाललं आहे? तुला हे कसं कळत नाही की रुपाली आहे.” त्यानंतर मैथिलीच्या रुपात असलेला शतग्रीव मनातल्या मनात, “या कुटुंबाला माझ्यामुळे त्रास झाला तरीही ते मला आधार द्यायचा प्रयत्न करत आहे.” असे म्हणताना दिसत आहे.
ही गोष्ट इंद्रायणी आत्याला कळते आणि ती म्हणते की, “ही मैथिली आहे, रुपालीसारखी वाईट नाही”. त्यानंतर नेत्रा घरच्यांना समजावते की, यांना आजच्या दिवस घरी राहू द्या”. त्यानंतर मैथिली मनातल्या मनात म्हणते की, ‘त्रिनयना देवीची लेक फसली. शतग्रीव विरोचकासारखा कमजोर नाही’. मालिकेच्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांनी “विरोचकात इतके रमले की देवीचा उदो उदो करण्यास विसरले वाटतं”, “यांना काही काम नाही म्हणून काहीही दाखवतात”, “बघायची इच्छाच गेली आहे”, “कृपया प्रेक्षकांना गृहीत धरणे बंद करा”, “आपली वाहिनी दर्जेदार कार्यक्रम देणारी वाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे. कृपया त्यास गालबोट लावणा-या अशा टूकार मालिका बंद करा”,” दर्शकांना वेडं बनवण्याचे काम चालू आहे. ही मालिकाच बंद झाली पाहिजे” अशा अनेक कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – “पैसे वेळेत देत नाहीत अन्…”, बहुचर्चित मराठी मालिकेच्या निर्मात्यांवर अभिनेत्याचे आरोप, नक्की मालिका कोणती?
दरम्यान, विरोचकाचा वध झाल्यानंतर एक साधी सरळ स्वभावाची मैथीली सेनगुप्ता शतग्रीव बनते आणि तिच्या सासूचा खून करत महाराष्ट्रच्या दिशेने निघते आणि तिने आता राजाध्यक्षांच्या घरात प्रवेशही केला आहे. त्यामुळे मैथिली सेनगुप्ता आणि नेत्राच्या नशिबात नेमकं काय लिहिलंय? ती नेत्राच्या बाळाला घेऊन जाणार आहे का? शतग्रीवच्या येण्याने पुन्हा राजाध्यक्षांवर काही नवीन संकट येणार का? हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.