शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पैसे वेळेत देत नाहीत अन्…”, बहुचर्चित मराठी मालिकेच्या निर्मात्यांवर अभिनेत्याचे आरोप, नक्की मालिका कोणती?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 22, 2024 | 2:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sukh Kalle serial fame Aashay Kulkarni shared a post on social media and said not getting money from producer

निर्मात्याने पैसे थकवल्याचा आशय कुलकर्णीचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मांडली व्यथा

प्रत्येक कलाकृती साकारण्यासाठी कलाकार दिवस-रात्र मेहनत करत असतात. आपल्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं हा त्यामागचा एकच उद्देश असतो. त्याबदल्यात आपल्या हाती आलेल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे इतकी साधी अपेक्षा कलाकारांची असते. पण कित्येकदा इंडस्ट्रीमध्ये कलाकारांकडून मानधनाच्याबाबतीत वेगळाच सूर कानी येतो. निर्मात्यांकडून पैसे मिळत नसल्याचं कलाकार स्वतःहून सांगतात. आज बऱ्याच कलाकारांचे पैसे अजूनही मिळाले नाहीत अशी कित्येक प्रकरणं आहेत. आता असंच काहीसं अभिनेता आशय कुलकर्णीच्या बाबतीत घडलं आहे. त्याने मालिकेचं नाव न घेता आपलं मत सोशल मीडियाद्वारे मांडलं आहे. हे प्रकरण नेमकं काय हे सविस्तर स्वरुपात जाणून घेऊया.

आशय सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुख कळले’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आशयने याआधी मराठी चित्रपटांसह मराठी मालिकांमध्येही उत्तम भूमिका साकारल्या. पण एका मराठी मालिकेत केलेल्या कामाचे पैसे त्याला अजूनही मिळाले नसल्याचं त्याने त्याच्या पोस्टमधून म्हटलं आहे. आशयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र ही पोस्ट लिहित असताना त्याने मालिकेचं नाव घेणं टाळलं आहे. या पोस्टद्वारे त्याने निर्मात्यांना पैसे मिळण्याबाबत प्रश्न विचारले आहेत.

आणखी वाचा – महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी’ची बाजी, शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, अनुराधा पौडवाल यांचा गौरव

आशयने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मध्यंतरी मी एका मालिकेत काम केलं. मालिकेने नुकताच ८०० भागांचा टप्पा पार केला. त्या शोचे प्रोडक्शन मॅनेजर, अकाऊंट डिपार्टमेंट, ईपी यांना वारंवार फोन, ईमेल केले. तरीही पैसे काही मिळाले नाही. आमच्याकडून रोज शूटला वेळेत येण्याची अपेक्षा असते, पण मग वेळेत पैसे देता का येत नाही?”. दरम्यान, नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेने आठशे भागांचा टप्पा पार केला. शिवाय आशयही या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत होता. त्यामुळे आशयने उल्लेख केलेली मालिका हीच असल्याची चर्चा होत आहे. मात्र सोशल मीडियावर या मालिकेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

आणखी वाचा – “माझ्याशिवाय ‘बिग बॉस मराठी’ चालणं अशक्य”, अभिजीत बिचुकलेंचा मोठा दावा, म्हणाले, “एक लाख टक्के मला बोलवणार कारण…”

दरम्यान, आशय सध्या सुख कळले मालिकेत काम करत आहे. आशय हा काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटात झळकला होता. तसेच त्याने झी मराठीवरील  ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेतही काम केलं आहे. त्याप्रमाणे आशय हा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. अशातच त्याच्या या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.  

Tags: Aashay KulkarniAashay Kulkarni Newsmarathi actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5

वडिलांचा अपमान लेकीला सहन होईना, जान्हवीला पॅडीच्या मुलीने सुनावताच कलाकारांकडून कौतुक, म्हणाले, "शाब्बास पोरी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.