शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

होळीनिमित्त सुकन्या मोनेंनी केला पुरणपोळ्यांचा खास बेत, झटपट पदार्थ करतानाचा व्हिडीओही केला शेअर, म्हणाल्या, “घरच्या मंडळींना सणाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 24, 2024 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sukanya Mone shared a special video of making Puranpoli on her social media

होळीनिमित्त सुकन्या मोनेंनी केला पुरणपोळ्यांचा खास बेत, झटपट पदार्थ करतानाचा व्हिडीओही केला शेअर, म्हणाल्या, “घरच्या मंडळींना सणाला...”

अभिनेत्री सुकन्या मोने या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध नाटकं, मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. सुकन्या मोने या उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम खवय्यादेखील आहेत. त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि ते इतरांना खाऊ घालायलाही खूप आवडतं.

अशातच आज होळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. होळीनिमित्त आज सर्वत्र होलिका दहनाच्या खास कार्यक्रमाबरोबरच पुरणपोळीचाही खास बेत असतो. होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत आजच्या या खास सणाचे सेलिब्रेशन केले जाते. त्यामुळे आजच्या होळीच्या खास दिनाचे औचित्य साधत सुकन्या मोने यांनी होळीच्या आदल्या दिवशी खास पुरणपोळीचा बेत केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhagyashri Karandikar (@iambhagyashrii)

आणखी वाचा – “एक माणूस समोरून आला अन्…”, प्रिया बापटने सांगितला तिच्याबरोबर घडलेला ‘तो’ धक्कादायक प्रकार, म्हणाली, “तेव्हापासून माझ्या मनात…”  

सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जात त्या पुरणपोळी करताना दिसत आहेत. भाग्यश्री करंदीकर यांनी सुकन्या मोने यांच्या पूरणपोळी बनवण्याच्या कृतीचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “खूप जास्त व्यस्त असणाऱ्या सुकन्याताई, होळीच्या एक रात्र आधी पुरणपोळ्या करत आहेत. आपल्या घरच्या मंडळींना त्या त्या सणाला एक सुटेबल पदार्थ मिळण्याची त्यांची ही आवड आणि एक तळमळ यातून दिसून येते.”

आणखी वाचा – “सातारा जिल्हा नकाशावर आणण्यात माझं योगदान…”, अभिजीत बिचुकलेंनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळताच व्यक्त केली भावना, म्हणाले, “माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण…”

तसेच यापुढे त्यांनी “हे खूपच प्रेरणादायी आहे” असं म्हणत “तुमचे हे कष्ट शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद आणि होळीच्या लाख लाख शुभेच्छा” असंही म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये सुकन्या मोने या अगदी आनंदात पुरणपोळ्या करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच त्या आगामी ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.  

Tags: marathi actressmarathi entertainment newssukanya mone
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Janhvi Kapoor climb stairs of tirupati temple on knees and actress reveal the reason

Video : जान्हवी कपूरने ‘या’ कारणासाठी गुडघे टेकत घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन, म्हणाली, “माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.