‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या प्रेमाचे बंध फुलताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर मालिकेत सकारात्मक गोष्टी घडताना पाहून प्रेक्षकांना आनंद होत आहे. ड्रग्ज प्रकरणात अर्जुन महीपतलाही खोत सिद्ध करत केस जिंकतो. आणि महीपतला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येते. हे पहिल्यांनंतर याच श्रेय अर्जुन पूर्णतः सायलीला देतो. त्यानंतर सायलीच सगळेचजण कौतुक करतात. (Tharal Tar Mag Promo)
पूर्णा आजीही सायलीवर खुश असतात. त्यानंतर अर्जुनची आई सायली व अर्जुनला होळीची जबाबदारी देते. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेत रंगपंचमी विशेष भाग लवकरच पाहायला मिळणार आहे. संपूर्ण सुभेदार कुटुंब या रंगपंचमीच्या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. रंगपंचमीच्या या भागात महत्त्वाचा ट्विस्ट येणार आहे. सुभेदारांच्या घरी प्रियादेखील रंग खेळायला आलेली असते. सगळेचजण रंग खेळत असतात तेव्हा प्रिया अर्जुनला रंग लावण्यासाठी पुढे येते आणि त्याला जबरदस्ती रंग लावते. त्यानंतर ती ‘मलाही रंग लाव’ असा हट्ट अर्जुनकडे करते.
प्रियाचं हे नाटक सायली लांब उभी राहून पाहत असते. ते पाहून सायलीचा पारा चढतो. अर्जुन काही केल्या प्रियाला रंग लावायला तयार नसतो हे पाहून सायली पुढे येते आणि प्रियाला चांगलंच सुनावते. ‘माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं’ अशी सक्त ताकीद ती सर्वांसमोर देते. प्रियाचा झालेला इन्सल्ट पाहून तिलाही राग येतो. मात्र ती त्यावेळी काहीच बोलत नाही. एवढ्यावरच न थांबता पुढे ती प्रियाला जोरात धक्का मारते. त्यावेळी प्रिया जाऊन रंगाच्या प्लेटवर पडते. आणि त्यानंतर सायली अर्जुनच्या हाताला धरुन त्याला घेऊन जाते.
सायलीने पहिल्यांदाच प्रियाला जशास तशी वागणूक दिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तर, दुसरीकडे अर्जुनला मनोमन सायलीचं कौतुक वाटतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असूनही सायलीने प्रियाला आपल्यापासून दूर लोटलं हे कसं घडलं याच विचारात तो असतो. सायलीलाही आपल्याबद्दल प्रेम वाटतं का असा प्रश्न अर्जुनला पडतो. त्यामुळे आता अर्जुन सायलीसमोर प्रेमाची कबुली केव्हा देणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.