रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

युनिक अन् कधीही न पाहिलेली डिझाइन, स्पृहा जोशीच्या नव्या मालिकेतील अनोख्या मंगळसूत्राची चर्चा, स्त्रियांची अधिकाधिक पसंती

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 31, 2024 | 5:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Spruha Joshi Mangalsutra

युनिक अन् कधीही न पाहिलेली डिझाइन, स्पृहा जोशीच्या नव्या मालिकेतील अनोख्या मंगळसूत्राची चर्चा, स्त्रियांची अधिकाधिक पसंती

मंगळसूत्र हा स्त्रियांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक स्त्री लग्नानंतर मंगळसूत्र घालते. पती बरोबरच्या नात्याची मंगळसूत्र ही खूण आहे. आजकाल विविध डिझाइन्सच्या मंगळसूत्रांची क्रेज स्त्रियांमध्ये असलेली पाहायला मिळते. विशेषता या स्त्रिया सोशल मीडियावरील हटके डिझाइन्सला फॉलो करताना दिसतात. इतकंच नव्हे तर मालिका, चित्रपटांमधील कलाकारांच्या मंगळसूत्रांची ही क्रेझ स्त्रीवर्गात पाहायला मिळते. (Spruha Joshi Mangalsutra)

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जानवीच्या गळ्यातील तीन पदरी मंगळसूत्र हे बरंच चर्चेत राहिलं होतं. आज मालिका संपून अनेक वर्ष झाली असली तरी या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आणि हे मंगळसूत्र बऱ्याच स्त्रियांनी घातलेलेही पाहायला मिळाले. आता यानंतर आणखी एका मालिकाविश्वातील अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. लवकरच कलर्स मराठीवर ‘सुख कळले’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे. आणि या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी झळकणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये स्पृहाला पाहून तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. स्पृहाचा मालिकाविश्वातील हा कमबॅक प्रेक्षकांना भरपूर आवडलेला दिसत आहे.

आणखी वाचा – लेकासाठी कायपण! वडील झाल्यानंतर विक्रांत मेस्सीने मुलासाठी केली ही खास गोष्ट, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी स्पृहाच्या मंगळसूत्राची चर्चा केलेली पाहायला मिळतेय. स्पृहाच्या गळ्यातील हटके मंगळसूत्राच्या डिझाईन लक्ष वेधून घेतले आहे. प्रोमोमध्ये स्पृहाच्या गळ्यात एक हटके मंगळसूत्र पाहायला मिळतंय जे अतिशय वेगळं आहे. या मंगळसूत्राची डिझाइन अतिशय खास आहे. मंगळसूत्रात चैन असून त्यात काळे मणी आणि शेवटी एक पेंडेंट आहे. या पेंडेंटच्या डिझाइनने सगळ्यांना चकीत केलं आहे. या पेंडंटमध्ये दोन पावलं आहेत. तर या पावलांच्या बोटांच्या जागी हिरे बसवण्यात आले आहेत. आता हे आगळंवेगळं मंगळसूत्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

आणखी वाचा – “मला मसालेभात…”, जुई गडकरीने सांगितला लग्नाच्या पंगतीतील तो किस्सा, म्हणाली, “भर लग्नात जेवताना उठवलं अन्…”

या मालिकेत स्पृहासह अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय स्पृहा व सागरबरोबर मिमी खडसे ही बालकलाकार देखील पाहायला मिळणार आहे. आता पुन्हा एकदा सागर व स्पृहा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, ही मालिका केव्हा पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

Tags: colors marathiSpruha Joshi Mangalsutraspruha joshi new serialsukh kalale new malika
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Tharal Tar Mag Promo

Video : प्रियाने अर्जुनला रंग लावताच सायलीचा पारा चढला, भर कार्यक्रमात धक्का मारला अन्…; पाहा प्रोमो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.