‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतात. मालिका सुरु झाल्यापासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका सुरु झाल्यापासून या मालिकेने अव्वल स्थान टिकवून ठेवलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेच्या कथानकानं आणि कलाकारांनी ही मालिका एका उंचीवर नेऊन ठेवली आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मालिकेत सायली व अर्जुनच्या जोडीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना पाहायला मिळतात. (Tharal Tar mag Set)
या मालिकेत एकामागे एक येणारी रंजक वळण पाहणं प्रेक्षकांनाही विशेष भावतंय. अशातच दिवस-रात्र मेहनत करुन ही कलाकार मंडळी चित्रीकरण पूर्ण करत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. काही दिवसांपूर्वीच मालिकेत रुचिरा जाधव या पात्राची म्हणजेच मानसी या पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. मानसीच्या येण्याने मालिकेत काही रंजक वळणे येणार का?, याकडे सरांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. अशातच रुचिरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मालिकेतील चित्रीकरणादरम्यानचा बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये मालिकेतील संपूर्ण सेटची झलक पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटची सफर या व्हिडीओमधून झाली. या मालिकेचे चित्रीकरण सध्या मुंबईतील मढ येथे सुरु असून हा खूप मोठा अवाढव्य सेट असलेला पाहायला मिळत आहे. अर्जुन हा पेशाने वकील असल्यामुळे त्याच्यासाठी असलेली वेगळी अशी स्टडीरूम या मालिकेत पाहायला मिळत आहे. या स्टडीरूम मध्ये अनेक पुस्तकांचा संग्रह पाहायला मिळत आहे. तर त्याच्या बाजूलाच किचन एरिया पाहायला मिळत आहे.
स्वयंपाक घरातील नीटनेटकेपणा साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. इतकंच नव्हेतर स्टडीरूम व स्वयंपाक घराच्या अगदी समोर लिविंग एरिया असलेला पाहायला मिळत आहे. लिविंग एरियाची शोभा ही तेथील फर्निचरने अधिक वाढवलेली पाहायला मिळत आहे. कुशन कव्हर्स, सोफा या सर्वच गोष्टींनी साऱ्यांचं अधिक लक्ष वेधून घेतले. इतकंच नव्हेतर कोपऱ्यात असणाऱ्या सुंदर अशा देवघरानंही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले. सुंदर अशा या देवघराला झेंडूच्या माळा सोडलेल्या पाहायला मिळत आहेत. आलिशान घर, आकर्षक इंटेरियर ही या ‘ठरलं तर मग’च्या सेटची जमेची बाजू आहे.