मराठी सिनेसृष्टीत एका मागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत गेले. पूजा सावंत, प्रथमेश परब, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, गौतमी देशपांडे, स्वानंदी टिकेकर यांसारखी अनेक कलाकार मंडळी विवबंधनात अडकली. दरम्यान या कलाकारांपैकी एका कलाकार जोडीच्या लग्नाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ही जोडी म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके. तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या शाही विवाह सोहळ्याची सर्वत्र विशेष चर्चा रंगली. दोघांचा २६ फेब्रुवारी रोजी अगदी पारंपरिक थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. (Titeeksha tawde and siddharth bodke enjoying at goa)
तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे दोघांच्याही लग्नाच्या फोटोंना भरभरुन प्रतिसाद दिला. सोशल मीडियावर तितीक्षा व सिद्धार्थ दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच लग्नानंतर ही जोडी लगेचच कामाला लागलेली पाहायला मिळाली. तितीक्षा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. मात्र आता मालिकेच्या या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून दोघही फिरायला गेले असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या दोघेही गोवा येथे फिरायला गेले आहेत. सोशल मीडियावरुन गोव्यातील काही खास फोटो शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती शेअर केली. अशातच सिद्धार्थ व तितीक्षाने गोव्यातील एक सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. यासह खास कॅप्शन देत त्यांनी असं लिहिलं आहे की, “जेव्हा आपण आखलेल्या योजना अखेर सत्यात उतरतात”, असं म्हणत त्यांनी स्कुटीवरुन गोव्यातील रस्त्यांवर फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
गोव्यात तितीक्षा व सिद्धार्थ बऱ्यापैकी रमलेले असून तिथं ते एन्जॉय करताना दिसत आहेत. गोव्याच्या रस्त्यांवर मनसोक्त फिरतानाचा शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तितीक्षाची बहिण अभिनेत्री खुशबू तावडे हिने ‘आईशप्पथ’ असं म्हणत हार्ट इमोजी शेअर केली आहे.