अनेक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत मराठीतील काही चित्रपटांची नावं अगदी आजही आवर्जून घेतली जातात. या चित्रपटांच्या यादीत एक महत्वाचं नावं म्हणजे सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवा बनवी’. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह अनेक मराठी कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध अशा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं. या चित्रपटातील डायलॉग आजही जगप्रसिद्ध आहेत. रील्स, मिम्स यांच्या द्वारे आज या चित्रपटाची चर्चा सर्वत्र केली जाते. या चित्रपटातील कलाकारांच्या भन्नाट अभिनय शैलीमुळे हा चित्रपट अजरामर झाला. (Ashi Hi Banwa Banwi Shooting Bts)
विशेष म्हणजे मराठी मनोरंजन सृष्टीतील तीन त्या काळीचे आघाडीचे आणि विनोदाचं हटके टायमिंग असलेले तीन प्रमुख कलाकार या चित्रपटात होते. हे तीन कलाकार म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि बहुरूपी अभिनेते अशोक सराफ. या तीन कलाकारांनी विनोद अचूक टायमिंग साधत चित्रपटाच्या कथानकाला योग्य यश मिळवून दिलं. चित्रपटातील हास्यसपद कथेप्रमाणेच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देखील असाच काही गमतीदार गोष्टी घडल्या होत्या. याबाबत या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी काही किस्से शेअर केले आहेत.
‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपट विनोदी कुठे सह गाजला तो म्हणजे चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यासाठी. मात्र या गाण्याच्या शूटिंग दरम्यान कोरियोग्राओफेर साची पिळगावकर यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. ही गोष्ट शेअर करताना सचिन पिळगावकर म्हणाले,”ज्या ४ जोडप्यांचा डान्स या गाण्यात दाखवण्यात आला आहे तो डान्स एकाच ठिकाणी शूट न करता वेगवेगळ्या जागांवर शूट करण्यात आला होता. तर जोड्यांमध्ये निवेदिता आणि सुशांत यांच्या जोडीचा डान्स बसवताना थोडी कसरत झाली. सिद्धार्थ हा उंचीने निवेदिता यांच्या पेक्षा मोठा असल्याने संपूर्ण डान्स निवेदिता यांना वर बघत तर सिद्धार्थ ला खाली बघत करावा लागला होता. तर कथेमध्ये बाकीच्या ३ जोडप्यांमध्ये प्रेम संबंध दाखवण्यात आल्यामुळे डान्स बसवताना काही अडचण आली नाही पण भांडण झालेल्या या जोडप्याचा डान्स बसवताना मोठी कसरत करावी लागली.”(Ashi Hi Banwa Banwi Shooting Bts)
तर लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया बेर्डे यांच्या गाण्याच्या पोर्शनची तालीम मुंबईत करून गाणं पुण्यात शूट करावं लागलं होत ते ही कमालीचं असल्याची आठवण देखील सचिन यांनी सांगितली होती.’अशी ही बनबनवी’ चित्रपटाने मिळालेली लोकप्रियता पाहून तेलुगू भाषेत ‘चित्रम भल्लारे विचित्रम’,कन्नड भाषेत ‘ओलू सार बारी ओलू’, हिंदी भाषेत ‘पेईंग गेस्ट’, पंजाबी भाषेत ‘Mr & Mrs ४२०’ आणि बंगाली भाषेत ‘जिओ पगला’ या भाषांमध्ये चित्रपटाची पुन्हा एकदा निर्मिती करण्यात आली. तर या सदाबहार चित्रपटाला आजही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटातील डायलॉग्स वर आजही अनेक मिम्स व्हायरल होताना दिसतात.