‘ठरलं तर मग’ मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. मालिकेत सध्या आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेच्या कथानकाने मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. इतकंच नव्हे तर सायली व अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सायली अर्जुनचा सध्या मालिकेत रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. अशातच दोघांमध्ये फुलणाऱ्या या प्रेमाला आता कोणाची तरी नजर लागणार असल्याचं दिसत आहे. मालिकेत एका नव्या पात्राची नुकतीच एंट्री झाली आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाने रंजक वळण घेतलं आहे. (Tharal Tar Mag BTS)
सध्या मालिकेत अर्जुनच्या जुन्या मैत्रिणीची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मानसीच्या येण्याने सायलीच्या चेहऱ्यावर बारा वाजले आहेत. अशातच आता मालिकेच्या सेटवरील सीन शूट करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेच्या सेटवरील कलाकारांची खरी कसरत पाहायला मिळत आहे. कोणाताही ब्रेक न घेता अत्यंत धावपळीत सीन शूट करताना त्यांची व कॅमेरा टीमची मेहनत या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
मानसी या नव्या पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव पाहायला मिळत आहे. रुचिराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मालिकेचा बीटीएस पोस्ट केला आहे. त्याखाली कॅप्शन देत तिने म्हटलं आहे की, “आणि अशाप्रकारे आम्ही हा वनशॉट सीन शूट केला. वनशॉट म्हणजे त्यामध्ये कोणतेही कट नाहीत. (थिएटरमध्ये सादर केल्याप्रमाणे) त्यामुळे आम्हाला घाईघाईने एका लोकेशनवरुन दुसऱ्या लोकेशनवर जावे लागले, लग्नाच्या सीनसाठी आम्ही सज्ज होतो. आधीच्या सीनमधून बाहेर पडत लग्नाच्या सीनकडे आणि तिकडून पुन्हा आधीच्या लोकेशनवर अशी धावपळ सुरुच होती. आम्ही आणि संपूर्ण क्रूने सीन शूट करताना मजा केली आणि मिळालेल्या आउटपुटमुळे आनंद झाला”, असं म्हणत तिने हा बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे.
मानसीच्या येण्याने मालिकेत सायली नाराज असल्याचं दिसत आहे. समोर आलेल्या बीटीएसमध्ये सायलीचा गैरसमज शूट करण्यात आला आहे की, मानसी व अर्जुनच लग्न होणार आहे. आता सायलीचा हा गैरसमज खरा ठरणार की सायली अर्जुनसमोर प्रेमाची कबुली देणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार.