बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारूचा लग्नाला नकार, तर अहिल्यादेवींनी आदित्यवर सोपवली लग्नाची जबाबदारी, दामिनीलाही दाखवली तिची जागा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 9, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial update

पारूचा लग्नाला नकार, तर अहिल्यादेवींनी आदित्यवर सोपवली लग्नाची जबाबदारी, दामिनीलाही दाखवली तिची जागा

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू मारुतीला जबरदस्ती बंगल्यात पाठवते आणि सांगते की, तू देवी आईला जाऊन लग्नाला माझा नकार असल्याचे सांगून ये. त्यानंतर मारुती अहिल्यादेवीसमोर समोर येतो तेव्हा तो आधी बोलायला घाबरतो. मात्र श्रीकांत त्याला जे असेल ते बोलायला सांगतो. तेव्हा मारुती सगळं काही देवी आई समोर बोलतो. पारू आत्ताच एका कठीण प्रसंगाला सामोरी गेली आहे, त्यामुळे आता ती काही लग्नाला तयार नाही त्याच्यामुळे मी काय तिला समजावू शकलो नाही. यावर अहिल्यादेवी शांतपणे, नम्रपणे सांगतात की, काही हरकत नाही जेव्हा पारूची इच्छा असेल तेव्हा आपण तिच्यासाठी मुलगा शोधू आणि तिचं लग्न करू. (Paaru Serial update)

यावर मारुती खूपच खुश होतो तर त्याच वेळेला आदित्य अहिल्यादेवींना सांगतो की, आपल्याला ब्रँडच्या कामानिमित्त गावोगावी जाऊन प्रमोशन कराव लागेल. त्यासाठी पारू सुद्धा तिथे लागेल यावर अहिल्यादेवी हो म्हणतात आणि प्रीतम व दिशाला सुद्धा बरोबर घेऊन जा असं सांगतात. पारूच्या लग्नाची जबाबदारी अहिल्यादेवी आदित्यला देतात. तेव्हा मारुतीला ते सांगतात की, पारूला कंपनीच्या कामानिमित्त दोन-तीन दिवस बाहेर जावं लागेल. यावर तो होकार देतो आणि तिथून निघून जात पारूला सांगतो की, देवी आईंना मी तुला इतक्यात लग्न करायचं नाही असं सांगितलं आहे. आणि त्यावर त्या पारूच्या मनासारखं होऊदे असं बोलल्या आहेत. तुला कंपनीच्या कामानिमित्त दोन-तीन दिवस बाहेर जावं लागणार आहे तेव्हा ती म्हणते की, मी गणीला सुद्धा घेऊन जाणार. त्यानंतर इकडे दामिनी मोहनला सांगत असते की, तुम्हाला काहीच वाटत नाही का मी इथे मोलकरीण म्हणून काम करत आहे. यावर मोहन म्हणतो की, ही तुझ्या पापाची शिक्षा आहे. त्याच्यामुळे ही शिक्षा तुला भोगावीच लागेल.

आणखी वाचा – गजकेसरी योगासह शोभन योगामुळे धनु राशीसह ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार, कुणाला होणार आर्थिक फायदा?, जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

सगळेजण जेवत असतात तेव्हा दामिनी धावत येते आणि डायनिंग टेबलवर जेवायला बसते. त्यावर सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. नंतर तिच्या लक्षात येतं की, आपण तर नोकर आहे आणि नोकरांनी असं मालकांबरोबर येऊन जेवायला बसायचं नसतं. तेव्हा ती उठायला जाते तितक्यात श्रीकांत तिला थांबवतो आणि बस जेवायला असं सांगतो. त्यानंतर जेवण सुरू असतानाच पारू बंगल्याबाहेर येते आणि सावित्रीला आवाज देते. सावित्री बाहेर जाते तेव्हा पारूने श्रीकांतसाठी लापसी बनवून आणलेली असते आणि ती लापसी ती सावित्रीला देते आणि सांगते की, हा डबा तू श्रीकांत सरांपर्यंत पोहोचवू शकतेस का?, त्यानंतर सावित्री तो डब्बा घेऊन येते, तेव्हा श्रीकांत विचारतो काय आहे त्या डब्ब्यात. तेव्हा सावित्री सांगते की, हा डबा पारुने पाठवला आहे त्यात लापसी आहे. तेव्हा अहिल्यादेवी विचारतात की, पारूने आपल्या किचनमध्ये येऊन हे बनवलं का? यावर सावित्री नाही असं सांगते आणि तिने तिच्या घरून बनवून दिला आहे असं सांगते.

आणखी वाचा – साखरपुडा झाला, पत्रिकाही छापल्या अन्…; सासरी जाण्यापूर्वी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मोडलं होतं स्वतःचं लग्न, कारण…

त्यावर दामिनी पारुची लायकी काढते आणि म्हणते की, आता नोकरांचा सुद्धा शेजार धर्म आपण पाळायचा का?, यावर अहिल्यादेवी दामिनीला उत्तर देत म्हणतात की, असंच असेल तर तू आज आमच्याबरोबर या डायनिंग टेबलवर जेवायला बसली नसतीस, कारण आज तू नोकर आहेस. हे ऐकल्यावर दामिनी शांत होते आणि शांतपणे जेवू लागते. त्यानंतर सगळेचजण लापशी खातात आणि पारूने बनवलेल्या या लापशीचं भरभरून कौतुक करतात. तर इकडे पारूला प्रसन्न वाटतं की, सगळ्यांनी लापशी खाल्लेली असते. आता मालिकेत पुढे काय होणार, दोन-तीन दिवस प्रमोशनसाठी बाहेर जाणार तेव्हा दिशा काही वेगळा डाव आखणार नाही ना?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Subodh Bhave And Shivani Sonar New Serial

सुबोध भावेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेची घोषणा, लूक पाहून प्रेक्षकही भारावले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.