शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सयाजी शिंदे यांच्या हृदयावर साताऱ्यामध्ये शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून मोठी माहिती, म्हणाले, “हृदयविकाराचा झटका येण्याआधीच…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 12, 2024 | 12:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sayaji Shinde recently underwent a heart surgery know about the actor's health

सयाजी शिंदे यांच्या हृदयावर साताऱ्यामध्ये शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून मोठी माहिती, म्हणाले, "हृदयविकाराचा झटका येण्याआधीच..."

मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ अशा अनेक भाषांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत नुकतीच एक माहिती समोर येत आहे. सयाजी शिंदे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल (११ एप्रिल २०२४) रोजी छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.

‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार, सयाजी शिंदेंची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सोमनाथ साबळे यांनी प्रकृतीबद्दल माहिती देताना असं म्हटलं की, “सयाजी शिंदेंना काही दिवसांपूर्वी असवस्थता जाणवत होती. त्यामुळे त्यांनी काही तपासण्या करुन घेतल्या होत्या. दरम्यान ECG मध्ये त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल थोडी कमी असल्याचं जाणवलं होतं. त्यांची स्ट्रेस टेस्टही करण्यात आली होती. यातही काही दोष सापडले. यावर आम्ही त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला होता.”

View this post on Instagram

A post shared by Sayaji Shinde (@sayaji_shinde)

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : आज सौभाग्य योगाचा शुभ संयोग, ‘या’ पाच राशींसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी, जाणून घ्या…

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “पुढे त्यांच्यावर आम्ही अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्या पूर्णपणे व्यवस्थित होत्या आणि उजव्या बाजूच्या एका रक्तवाहिनीमध्ये ९९ टक्के ब्लॉक आढळला. तपासणीमध्ये आलेला दोष आम्ही काढून टाकला असून हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते. पण आता त्यांची प्रकृती पूर्णत: स्थिर आहे आणि लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.”

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनच्या माहेरी दणक्यात साजरा झाला लग्नानंतरचा पहिला सण, जावई बापूंचाही खास पाहुणचार, म्हणाले, “लग्नानंतर…”

त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर येताच त्यांचे अनेक चाहतेमंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान, आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे सायाजी शिंदे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळेही चांगले चचर्चेत असतात. त्याचबरोबर त्यांचे वृक्षप्रेमही अगदी जगजाहीर आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या संस्थेअंतर्गत वृक्षरोपणाचे कामही करतात. सयाजी शिंदे यांनी आजवर मराठी-हिंदीसह कन्नड, तामिळ, मल्याळम तसेच तेलुगू चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप सर्व प्रेक्षकांवर सोडली आहे.

Tags: marathi actorsayaji shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Nora Fatehi On Film Industry

"इतर मुलींसारखी मी नाही", बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव सांगताना नोरा फतेहीचं मोठं विधान, म्हणाली, "कामाची गरज म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.