छोट्या पडद्यावरील मालिका या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. मालिकांमध्ये येणारे नवनवीन कथानक, पात्र या सर्वच गोष्टी प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करतात. काही दिवसांपासून नवनवीन मालिका या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. वेगवेगळ्या कथानकावर आधारित मालिकांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अशातच आता सोनी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. या नव्या मालिकेने सर्वांचीच उत्सुकता वाढवून ठेवली आहे. (Subodh Bhave And Shivani Sonar New Serial)
‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे घराघरात पोहोचला. या मालिकेनंतर सुबोधने पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक केलेलं पाहायला मिळत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे पाहायला मिळते. तर सुबोधसह ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. शिवानी व सुबोध यांची ऑनस्क्रीन जोडी पहिल्यांदाच मालिका विश्वात काम करताना पाहायला मिळणार आहे. शिवानीसाठी ही खूप मोलाची संधी असल्याचेही अनेकांनी म्हटलं आहे. आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
२५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणारी ही मालिकेची कथा आता नेमकं काय पडद्यावर दाखवणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे. “नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण, ‘जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते'”, असं कॅप्शन दिलं आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत सुबोध-शिवानीची ऑनस्क्रीन एकत्र जोडी पाहून नेटकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
तू भेटशी नव्याने’ ही मालिका नेमकी कधी सुरु होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुबोध बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये परतला आहे. तर शिवानी सोनारही काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिच्या साखरपुड्यामुळे ती चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे.