सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत अखेर अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री, ‘हे’ पात्र साकारणार, प्रोमो समोर

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 26, 2023 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Premachi Goshta new Promo

'प्रेमाची गोष्ट'चा नवा प्रोमो समोर

स्टार प्रवाहवरील अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहे. याच वाहिनीवरील एका मालिकेची सध्या चर्चा होत आहे, ती म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका. काही दिवसांपूर्वीच ही मालिका सुरु झाली. जी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही वर्षांच्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्याचबरोबर राज हंचनाळे, शुभांगी गोखले, अपूर्वा नेमळेकर अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेला लाभली. मालिकेचे कथानक व कलाकारांच्या अभिनयामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरत असून अवघ्या दोन आठवड्यातच मालिका टीआरपीमध्ये पहिल्या स्थानावर आली आहे. (Premachi Goshta new Promo)

नुकतेच मालिकेला सुरुवात झाली असून मालिकेच्या आतापर्यंतच्या भागात प्रेक्षकांना मुक्ता आणि सागरची भेट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, सावनीची मालिकेत अद्याप एन्ट्री झाली नव्हती. मालिकेच्या पुढच्या भागात सावनीची एन्ट्री होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना खलनायिकेची झलक पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा – धडाकेबाज ऍक्शन असलेल्या ‘अंकुश’ चित्रपटाच्या थरारक ट्रेलरने वेधलं लक्ष, केतकी माटेगांवकरच्या लूकची होतेय चर्चा

‘रात्रीस खेळ चाले’ व ‘बिग बॉस मराठी’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर मालिकेत ‘सावनी’ हे खलनायिकेचं पात्र साकारताना दिसणार आहे. नुकताच त्याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अपूर्वाचा खलनायिका अवतार पाहायला मिळतोय. स्टार प्रवाह वाहिनीने हा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आले आहे की, हर्षवर्धन सागरला त्याच्या भूतकाळाची आठवण करुन देतो. त्यावर सागर हर्षवर्धनला प्रत्युत्तर देताना दिसतोय. नेमकं त्याचवेळी सावनीची एन्ट्री होताना पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

हे देखील वाचा – भरजरी पैठणी भेट दिल्याने वनिताने मानले अरुण कदमांचे आभार; तर मराठमोळ्या लूकमधील वनिताच्या हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

दरम्यान, अपूर्वाचा मालिकेतील लूक तिच्या चाहत्यांसह प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. आता मालिकेतील खलनायिकेच्या एन्ट्रीनंतर आगामी भागात काय पाहायला मिळणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: apurva nemlekarpremachi goshtaPremachi Goshta new Promostar pravahtejashri pradhan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Shreyas Talpade Shared Experience

वाट चुकलेल्या श्रेयस तळपदेला देवानेच दाखवला रस्ता, पोस्ट शेअर करत म्हणाला, "कोणत्या रुपामध्ये देव…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.