गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धडाकेबाज ऍक्शन असलेल्या ‘अंकुश’ चित्रपटाच्या थरारक ट्रेलरने वेधलं लक्ष, केतकी माटेगांवकरच्या लूकची होतेय चर्चा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 26, 2023 | 11:05 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankush Movie Trailer

धडाकेबाज ऍक्शन असलेल्या 'अंकुश' चित्रपटाच्या थरारक ट्रेलरने वेधलं लक्ष, केतकी माटेगांवकरच्या लूकची होतेय चर्चा

ऍक्शन, थरारक, रोमान्सचा भरणा असलेला व कलाकारांची मांदियाळी असलेल्या अंकुश चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर हवा आहे. चित्रपटातील गाण्यांनी तर सर्वत्र धुमाकूळच घातला आहे. अनेक कलाकारांचा अभिनयाने तयार झालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातील गाण्यांपाठोपाठ आता चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Ankush Movie Trailer)

बीडचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक व चित्रपट निर्माते श्री. राजाभाऊ घुले यांचा आगामी बिगबजेट ऍक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार आणि राज्याचे माजी मंत्री तसेच परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे लाँच करण्यात आला. राजकीय पार्श्वभूमीच्या कथानकाला प्रेमकथेची जोड असलेल्या ‘अंकुश’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – Video: ‘लक्ष्मी आली घरी’ म्हणत राहुल वैद्यच्या आई-बाबांनी केलं नातीचं स्वागत, म्हणाला, “यापेक्षा जास्त…”

अंकुश चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे पाहायला मिळत आहे की, “सामान्य कुटुंबातला तरुण, त्याच्या आयुष्यात आलेली तरुणी, कॉलेज जीवनात उमलणारं प्रेम, काहीतरी करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणासमोर आलेला राजकारणाचा डाव असा थरार ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच धडाकेबाज ऍक्शनच दर्शन घडत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. गायिका अभिनेत्री केतकी माटेगावकरचं लोभस दिसणंही चित्रपटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुरेपूर मनोरंजनाचा आनंद देणारा ‘अंकुश’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना केवळ ६ ऑक्टोबरची प्रतीक्षा आहे.”

View this post on Instagram

A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)

‘ओमकार फिल्म्स क्रिएशन्स’च्या माध्यमातून राजाभाऊ घुले यांनी ‘अंकुश’ या चित्रपटातुन चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांचे आहे . मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज व चिनार- महेश या सिनेमाचे संगीतकार आहेत. हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. मंगेश कांगणे, क्षितिज पटवर्धन, समृद्धि पांडे व मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज , हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. नागराज दिवाकर यांनी छायांकन, तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक नीलेश गावंड यांनी या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.

आणखी वाचा – Video : वाहती नदी अन् गावचं जेवण…, शूटिंगमधून वेळ काढत प्रसिद्ध अभिनेता पोहोचला कोकणात, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, “मन आणि शरीर…”

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि केजीएफसारख्या चित्रपटांचे ऍक्शन दिग्दर्शक विक्रम मोर, विख्यात नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी नृत्य दिग्दर्शन, कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांनी केलं असून विशाल चव्हाण कार्यकारी निर्माता आहेत. चित्रपटात केतकी माटेगावकर, स्वप्नदीप घुले, सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, मंगेश देसाई, ऋतुजा बागवे, शशांक शेंडे, गौरव मोरे, नागेश भोसले, पूजा नायक अशी दमदार स्टारकास्ट आहे.

Tags: ankushankush movie trailerankush the filmketaki mategaonkarmarathi filmmarathi movieswapndeep ghule
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Premachi Goshta new Promo

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत अखेर अपूर्वा नेमळेकरची एन्ट्री, 'हे' पात्र साकारणार, प्रोमो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.