शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भरजरी पैठणी भेट दिल्याने वनिताने मानले अरुण कदमांचे आभार; तर मराठमोळ्या लूकमधील वनिताच्या हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 26, 2023 | 10:18 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vanita Kharat Mangalsutra

भरजरी पैठणी भेट दिल्याने वनिताने मानले अरुण कदमांचे आभार; तर मराठमोळ्या लूकमधील वनिताच्या हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष

‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. आज जगभरात वनिताचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. उत्तम अभिनयाने, तसेच सादरीकरणाने वनिताला आजवर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. कलाकार मंडळींमुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम नेहमीच अव्वल ठरतो. अशातच प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कार्यक्रमातील लोकप्रिय चेहरा म्हणजे वनिता खरात. (Vanita Kharat Mangalsutra)

वनिता खरात सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही ना काही खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचा लक्ष वेधून घेत असते. वनिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. वनिताने नुकतीच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्ट मध्ये वनिताने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला कन्यारत्न प्राप्त, इन्स्टाग्रामवर लेकीबरोबरचे फोटो शेअर करत केला तिच्या नावाचा खुलासा

वनिताने इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यांत तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळतोय. पैठणी, नाकात नथ, गजरा असा मराठमोळा अंदाज वनिताचा पाहायला मिळतोय. यांत लक्षवेधी बाजू म्हणजे वनिताचं मंगळसूत्र. मध्यंतरी कलाकारांच्या मंगळसूत्रांची क्रेझ चाहत्यांमध्ये पसरली होती. आता वनिताने शेअर केलेल्या फोटोंमधील तिच्या मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनिताच्या सोन्याच्या मोठ्या मंगळसूत्राने लक्ष वेधलं आहे. तीच हे हटके मंगळसूत्र चाहत्यांनाही आवडलं आहे. गणेशोत्सवानिमित्त वनिताचा मराठमोळा लूक पाहायला मिळाला होता, या दरम्यान तिची साडी व तिच्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं.

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

आणखी वाचा – Tharal Tar Mag New Promo: कोणी केला सायलीवर जीवघेणा हल्ला? अर्जुन वाचवू शकेल का सायलीला?

हे फोटो शेअर करत वनिताने अभिनेते अरुण कदम यांचे आभार मानले आहेत. कारण ही सुंदर, भरजरी पैठणी वनिताला अरुण कदम यांनी भेट दिली आहे. वनिताने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “गणेशोत्सवानिमित्त मी ही पैठणी साडी नेसले होते. ही साडी मला आमचे लाडके अरुण काका यांनी लग्नाची भेट म्हणून दिली होती. अरुण काका लव्ह यु. खूपच सुंदर साडी आहे ही. साडीप्रेम वाढतचं चाललंय.” असं कॅप्शन देत तिने अरुण कदम यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Tags: arun kadamentertainmentmaharashtrachi hasy jatramaharashtrachi hasya jatramhjvanita kharat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Santosh Juvekar enjoys vacation in Kokan

Video : वाहती नदी अन् गावचं जेवण…, शूटिंगमधून वेळ काढत प्रसिद्ध अभिनेता पोहोचला कोकणात, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, "मन आणि शरीर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.