Ude Ga Ambe New Serial On Star Pravah : सध्या सर्वत्र नवरात्र सुरु झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या या नवरात्रीत साऱ्यांची उत्सुकता वाढून राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकाविश्वातही नवरात्र जोरदार साजरी करण्यात येते. अशातच नवरात्रीच्या या उत्सवात भर घालायला एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच आशयघन विषय प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असते. आता नवरात्रोत्सवाच्या धामधूमीत ‘उदे गं अंबे’ ही मालिका साडे तीन शक्तिपिठांची माहिती घेऊन स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणार आहे. या मालिकेच्या रुपात अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्तीच भक्तांच्या घराघरांत अवतरणार आहे.
दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर म्हणजेच ११ ऑक्टोबरपासून ही मालिका प्रदर्शित होणार असून याचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत आदिशक्तीच्या भूमिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे दिसणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो समोर येताच मयुरीच्या लूकची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या मालिकेसाठी देवीचं हुबेहुब रुप साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. रेणुका देवींची भूमिका बालकलाकार आराध्या लवाटे साकारताना दिसत आहे.
‘कोठारे व्हिजन’ची निर्मिती असणाऱ्या या मालिकेमध्ये साडे तीन शक्तिपिठांची सविस्तर भावगर्भ व भक्तिरसपूर्ण कहाणी बघायला मिळणार आहे. मयुरीसह या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या मालिकेत देवदत्त भगवान शंकरांच्या रुपात दिसणार आहे. याआधी महेश कोठारे व देवदत्त यांची ‘जय मल्हार’ ही मालिका तुफान गाजली होती. त्यानंतर आता त्यांची ही नवी मालिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करेल यांत शंका नाही.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीच्या बोलण्यामध्ये आला अभिजीत, अंकिताची चुगली येऊन सांगितली अन्…; एकमेकांवर आरोप
मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या पहिले पुष्प रेणुका माता यांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. भक्तांच्या हाकेला धावून जात त्यांचं रक्षण करण्यात रेणुका माता यांचं श्रेय प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. माहूर गडावर असलेल्या या रेणुका मातेचं वेगळं रुप मालिकेसाठी घडवण्याची संधी देत आहे. याशिवाय मालिकेत तुळजापूरची देवी भवानी माता, कोल्हापूरची देवी अंबाबाई आणि वणीची देवी सप्तशृंगी या तिन्ही देवींचा आशीर्वाद मिळणार आहे.