मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्कीच्या बोलण्यामध्ये आला अभिजीत, अंकिताची चुगली येऊन सांगितली अन्…; एकमेकांवर आरोप

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 3, 2024 | 1:46 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Ankita Prabhu Walawalkar tells Nikki Tamboli to give courage to Abhijeet Sawant

Bigg Boss Marathi 5 मध्ये अंकिता प्रभू वालावलकर निक्की तांबोळीला अभिजीत सावंतला हिंमत दे असं म्हणते

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरू असून आता हा खेळ अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात शेवटच्या आठवड्यातसुद्धा सदस्यांची बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये अंकिता, निक्की आणि अभिजीत यांच्यात घरातील कामाच्या ड्युटीवरून वादावादी झालेली पाहायला मिळाली. यावेळी निक्की, जान्हवी, वर्षा, डीपी, सूरज, अंकिता आणि अभिजीत घरातील कामाची विभागणी करून घेत असतात. तेव्हा अभिजीत निक्कीची वॉशरूम साफ करण्याची ड्युटी काढून घेऊन तिला डायनिंग टेबल पुसण्याची ड्युटी देतो. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

‘बिग बॉस मराठी’च्या काही दिवसांपूर्वी झालेल्या भागामध्ये निक्की, जान्हवी, वर्षा ताई, डीपी, सूरज, अंकिता आणि अभिजीत घरातील कामाची विभागणी करून घेत असतात. तेव्हा अभिजीतची निक्कीची वॉशरूम साफ करण्याची ड्युटी काढून घेऊन तिला डायनिंग टेबल पुसण्याची ड्युटी देतो. त्यांच्यातील हे वाद कमी झाले असले तरी दोघांमध्ये धुसपुस कायम आहे. त्यात अभिजीत निक्कीबरोबर राहत असल्याने अंकिता व डीपी त्याच्यापासून अंतर राखून बोलतात. याचबद्दल अभिजीत त्या दोघांशी बोलायला जातो. मात्र निक्की येताच तो तिथून निघून जातो.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

बाथरुम परिसरात अभिजीत, अंकिता व डीपी बोलत असतात आणि निक्कीला पाहून तो दुसरीकडे जातो. त्यावर निक्की दोघांना असं म्हणते की, “अभिजीत गेला का?”. त्यावर अंकिता तिला “तुम्ही इथे होता ना?” असं म्हणते. यावर निक्की दोघांना उत्तर देत असं म्हणते की, “मग काय झालं तुम्ही तर नॉर्मलच बोलत होतात’. यावर अंकिता अभिजीतबद्दल तिला असं म्हणते की, “त्याच्यासाठी हिंमत लागते. बघ थोडी हिंमत दे त्याला… अभिजीतला हिंमतीची गरज आहे.”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुम्ही एकटे एकटे का बसता?”, अभिजीतचा डीपी-अंकिताला प्रश्न, शेवटच्या आठवड्यात गेमच बदलला, कोण चुकीचं?

नंतर अंकिता डीपीला अभिजीतबद्दल असं म्हणते की, “आतापर्यंतच्या कोणत्याही टास्कमध्ये त्याने कधी प्लॅनिंग केलं नाही. काय केलं नाही आणि याला आमचा गेम दिसत नाही. याला माझा गेम दिसत नाही.” पुढे निक्की अभिजीतला बाहेर येऊन घडलेला सगळा प्रकार सांगते, तेव्हा अभिजीत असं म्हणतो की, “काय वाईट प्रकार आहे हा. तुम्ही जर पांघरुन घालून जर वाईट बोलत असाल तर त्या माणसाला चांगलं थोडी म्हटलं जाणार”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की घरजावई करणार, तर सूरजनेही सांगितलं त्याच्या लग्नाचं संपूर्ण प्लॅनिंग, हळदीला धुमाकूळ घालणार

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहेच आणि हे एलिमिनेशन आज पार पडणार आहे. त्यामुळे अभिजीत, अंकिता, सूरज, डीपी, वर्षा आणि जान्हवी या उरलेल्या सदस्यांपैकी एलिमिनेशनमध्ये कोणाचा प्रवास संपतोय? याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: abhijeet sawantAnkita Prabhu walawalkarBigg Boss Marathi 5 daily updatesnikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 abhijeet sawant family

Bigg Boss Marathi : असा जावई हवा गं बाई! सासूबाईंनी अभिजीतसाठी शूट केला खास व्हिडीओ, म्हणाल्या, "आमच्या अभिजीतला तुम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.