शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’चा रिमेक येणार?, मालिका शेवटाकडे असताना दिग्दर्शकांचं भाष्य, म्हणाले, “रिमेक करायला…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 11, 2024 | 3:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Star Pravah Aai Kuthe Kay Karte marathi director Ravi Karamkar talked on the remake of the serial

‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या रिमेकबद्दल दिग्दर्शक रवी करमरकर यांचं भाष्य

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ने गेल्या ५ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. अनेकदा मालिकेच्या कथानकावर टीका झाली, मात्र तरीही प्रेक्षकवर्ग कमी झालेला नाही. गेल्या काही काळापासून मात्र टीआरपीचे गणित बिघडले होते. प्रेक्षकांनी मालिका रटाळ झाली आहे, आता बंद करा अशी टीकाही केली. काही महिन्यांपूर्वी मालिकेची वेळ बदलण्यात आली. दुपारी २.३० वाजताची वेळ ‘आई कुठे काय करते’ मालिकेला देण्यात आली. पण, आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. मालिकेच्या निरोपानिमित्त ‘इट्स मज्जा’ने नुकताच ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या टीमबरोबर संवाद साधला. (Aai Kuthe Kay Karte Serial Remake)

यावेळी ‘आई कुठे काय करते’च्या दिग्दर्शकांबरोबर ‘इट्स मज्जा’ बरोबर गेल्या पाच वर्षांतीळ काही खास क्षण शेअर केले. यावेळी त्यांना मालिकेच्या रिमेक बद्द प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत ‘आई कुठे काय करते’चे दिग्दर्शक रवी करमरकर यांनी असं म्हटलं की, “रिमेक बद्दल अजून तरी काही विचार केलेला नाही. पण रिमेक करायला आवडेल. चॅनेल म्हणालं तर नक्की या मालिकेचा रिमेक करायला मला आवडेल”. मालिका सुरू झाल्यानंतर अगदी अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पहिल्या प्रोमो पासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

आणखी वाचा – “१२-१३ वर्षांचा असतानाचा ड्रग्ज घ्यायला लागलो आणि…”, स्मिता पाटील यांच्या लेकाचं मोठं भाष्य, म्हणाला, “कौटुंबिक परिस्थितीमुळे…”

‘आई कुठे काय करते’ या मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर याचा हिंदी रिमेक करण्यात आला आणि स्टार प्लसवर ‘अनुपमा’ ही मालिका सुरू करण्यात आली. मालिकेचं कथानक सारखेच असल्यामुळे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं अनेकांना वाटतं. पण, तसं नाही. आई कुठे काय करते ही मालिका ‘श्रीमोयी’ या बंगाली मालिकेचा रिमेक आहे ही मालिका स्टार जलसावर प्रदर्शित होत होती.

आणखी वाचा – ‘शक्तिमान’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, टीझरही प्रदर्शित, नव्या रुपात बच्चे कंपनींचं मनोरंजन होणार, व्हिडीओ एकदा पाहाच

दरम्यान, पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रेक्षकांनी देशमुख कुटुंबातले सुखाचे क्षण आपले मानून आनंद व्यक्त केला तर संघर्षाच्या काळात काळजीरूपी साथदेखील दिली. प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमामुळं ही मालिका प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनामनांत पोहोचली.

Tags: Aai Kuthe Kay Karte Director Ravi KarmarkarAai Kuthe Kay Karte Serial RemakeMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
annu kapoor on indian citizenship

नाईलाजास्तव मी माझ्या देशाशी प्रामाणिक कारण, अन्नू कपूर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “बायको अमेरिकन...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.