‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. मालिकाविश्वातून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप कायमच प्रेक्षकांच्या मनावर सोडली. यासोबतच स्पृहाला सूत्रसंचालकच्या भूमिकेत पाहणं ही रंजक ठरलं. स्पृहा आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय ती तिच्या स्वभावामुळे. मनमोहक, लाघवी, सुजाण, सुशील अशी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. स्पृहाचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. सोशल मीडियावरही स्पृहाचा चाहतावर्ग आहे. स्पृहा तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते. स्पृहाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे.(Spruha Joshi College Memories)
पहा स्पृहाचा हा कॉलेजचा फोटो (Spruha Joshi College Memories)
स्पृहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. हा तिचा फोटो तिच्या कॉलेजचा आहे. २०१० मधील कॉलेजचा एक फोटो शेअर करत स्पृहाने कॉलेज डे २०१०! थँक यु गुगल मेमरीस! असं कॅप्शन देत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत स्पृहाचा गोड अन्दाज पाहायला मिळतोय. तिचा हा फोटो पाहून स्पृहा कॉलेजच्या आठवणीत रमलेली दिसतेय. तिच्या या फोटोवर कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय.
स्पृहा ही आपल्याला “लोकमान्य” या मालिकेत टिळकांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसत आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी ही मुंबईकर आहे. मुंबईतच तिने तीच शिक्षण पूर्ण केले. दादरच्या बालमोहन विद्यालयात तिने शालेय शिक्षण घेतले. शालेय वयापासूनच तिला पुस्तके वाचनाची आवड होती. कविता वाचनाचा, लिहिण्याचा छंद तिने शालेय जीवनापासूनच जोपासला. वाचनासोबतच तिला नृत्य आणि फिरण्याची आवड देखील आहे. बालमोहनमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर स्पृहाने रामनारायण रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असताना तिने यूथ फेस्टिव्हल, आयएनटी सारख्या एकांकिका स्पर्धांमधून नाव कमावले.(Spruha Joshi College Memories)
हे देखील वाचा – ‘पडशील बाई’ प्रिया बापट झाली ट्रोल
मुळची पुण्याची असलेली स्पृहा कामानिमित्ताने मुंबईची मुलगी झाली असली तरी तिच्यात पुणेरी बाणा आणि शब्दाला शब्द देण्याची कला नेहमीच जागृत असते. मोजकं आणि नेमकं काम हा तिचा विशेष गुण आहे. त्यामुळे आजपर्यंतची तिच्या मालिका असो नाटक असो किंवा सिनेमा हे वेगळ्या विषयावर, वेगळ्या मांडणीचे असल्याचा आपल्याला बघायला मिळतात. लोकमान्य या मालिकेच्या निमित्ताने स्पृहा जवळपास ८ वर्षांनी मालिका विश्वात परतली आहे. स्पृहाने तिच्या अभिनयशैलीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर केलय.