मराठी चित्रपट सृष्टीला प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने तिचे करियर स्वबळावर घडवले आहे. प्रिया तिच्या बिन्दास्त अभिनयामुळे देखील ओळखली जाते. प्रिया कामासोबतच तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट मुळे देखील चर्चेत असते, प्रियाने काही दिवसांपूर्वी बोल्ड अंदाजातलं फोटोशूट केलं होत. आणि तिच्या त्या फोटो शूटवर बरीच चर्चा रंगली होती. प्रियाने आता नुकतेच नवीन फोटोशूट केले असून तिच्या एका फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. (Priya Bapat Troll)

प्रियाने पोस्ट केलेल्या या फोटो मध्ये तिने ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान केलाय. या लूकमध्ये प्रिया “स्टनिंग” दिसत आहे. आणि त्याच बरोबर या फोटोसाठी प्रियाने खाली वाकलेली पोज दिली आहे. तिने या पोस्टला कॅप्शन सुचवा असं चाहत्यांना सांगितलं आहे. त्यावर चाहत्यांनी “नाचू किती नाचू किती कंबर लचकली” तसेच “आता होऊन जाऊ दे एक कोलांटी उडी” “कुर्ला स्टेशनवर ट्रेन मध्ये चढताना मी” “वाळत घातलेले कपडे बी लाइक” असे वेगवेगळ्या प्रकारचे फनी कॅप्शन प्रियाला सुचवले आहेत. तर अनेकांनी तिला म्हंटलंय “बाई सांभाळ नाही तर पडशील” याचबरोबर “सिटी ऑफ ड्रीमस” चा सीजन ३ केव्हा येणार या बद्दल देखील प्रियाला विचारणा करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: प्रार्थनाचा नो मेकअप लुक, श्रेयसच्या कमेंटने वेधलं लक्ष…

हे देखील वाचा: हनुमान जयंतीचं औचित्य साधून देवदत्तने शेअर केला आदिपुरुष चित्रपटातील नवीन लुक प्रभास ने ही शेअर केला लुक
प्रिया बापटचं ‘सोनल’ नावाचं प्रोडक्शन
प्रियाचा नवरा उमेश कामत सुद्धा अभिनेता असून प्रियाने उमेश सोबत काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. याच बरोबर प्रिया आणि उमेश यांनी “दादा एक गुडन्युज आहे” या नाटकाची निर्मिती सोनल प्रोडक्शन्स द्वारे केली आहे. या नाटकाचे प्रयोग अद्यापही नाट्यगृहात सुरु असून या नाटकामध्ये उमेश कामत सोबत अभिनेत्री ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. (Priya Bapat Troll)

प्रियाने अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. टाईमपास २, वजनदार, आम्ही दोघी, काकस्पर्श, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत. तिचा पती उमेश सोबतचा ” आणि काय हवं” ही मराठी वेबसिरीज सुद्धा खूप गाजली होती. या व्यतिरिक्त प्रिया “सिटी ऑफ ड्रीम” या हिंदी वेबसिरीजच्या दोन्ही भागात दिसली आहे. प्रियाने बापटने काही रियालिटी शोचे सूत्र संचालन सुद्धा केलं आहे.