मराठी मालिका विश्वात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या पात्रांपैकी एक पात्र म्हणजे शेवंता. झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय मालिका ठरलेली ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रेक्षकांच्या चावल्यास पसंतीस उतरली होती त्या मालिकेतील आणा नाईक आणि शेवन्ता ही जोडी आजही लोक विसरू शकले नाहीत. शेवतांची भूमिका साकारणारे अभिनेत्री अपूर्व नेमळेकर या पात्रामुळे महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचलं. पुढे अपूर्वा नेमळेकर हे नाव कलर्स मराठी वाहिनी वरील लोकप्रिय रियॅलिटी शो बिग बॉस मधून पुन्हा प्रेक्षकांच्या समोर आलं.आपल्या उत्कृष्ट खेळामुळे शोच्या अंतिम दिवसांपर्यंत अपूर्वा ने मजल मारली आणि प्रेक्षकांची मन जिंकली. बिग बॉस नंतर अपूर्वाच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल प्रेक्षक उत्सुक होते. तर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे अपूर्व लवकरच आगामी ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.(Apurva Nemlekar New Movie)

आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची ‘शाहीन आपा’ ही भूमिका अपूर्वा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटात साकारणार आहे येत्या १२ मे ला इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे. निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ‘रावरंभा’ ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
हे देखील वाचा – आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’
१२ मे ला ‘रावरंभा’ प्रदर्शित
‘शिवछत्रपतींच्या कार्याला छुपी मदत करणारी ‘शाहीन आपा’ अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. ‘ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वत:ला ही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे.असं अपूर्वाने तिच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे.(Apurva Nemlekar New Movie)

शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत.