दाक्षिणात्य अभिनेता राम चरण हा त्याच्या सुपरहीट चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. २०२२ मध्ये आलेल्या ‘RRR’ या चित्रपटातून तो अभिनेता एन. टी.आर ज्यु. व अभिनेत्री आलिया भट्टसह दिसून आला होता. २०१२ मध्ये तो उपासना कोनिडेलासह लग्नबंधनात अडकला. जून २०२३ मध्ये त्याला मुलगी झाली. राम चरणच्या मुलीच्या जन्मानंतर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी त्याचे अभिनंदन केले आणि महागड्या भेटवस्तूही दिल्या. पण आता पुन्हा एकदा राम चरण व त्याची पत्नी चर्चेत आले आहेत. (Actor Ram Charan viral video )
गुजरात येथील जामनगर येथे मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा म्हणजे अनंत अंबानी व राधिका अंबानी यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची धूम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील अनेक दिग्गजांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणे पाठवली गेली. त्यामध्ये दक्षिणेकडील सुपरस्टार राम चरणलादेखील उपस्थित राहणार होता. जामनगर येथे तो त्याच्या खासगी विमानाने दाखल झाला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची पत्नी उपासनाही होती. त्यांच्या प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
????❤️@AlwaysRamCharan @upasanakonidela pic.twitter.com/dmGBnk7V5Q
— Raees (@RaeesHere_) March 1, 2024
रामचरण व त्याची पत्नी उपासना हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. अनेकदा त्या दोघांमध्ये असलेले प्रेम सर्वांसमोर दिसूनही येते. नुकताच राम चरण हा उपासनाच्या पायाला मालीश करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रामचरण त्याची पत्नी उपासनाचे पाय मांडीवर घेऊन मालीश करत असलेला दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकाऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “कपल गोल्स”, दुसऱ्याने लिहिले की, “त्यांना बेस्ट कपल म्हणून पुरस्कार द्या”, तसेच एकाने लिहिले की, “इंटरनेटवरील आजचा भारी फोटो”.
रामचरण व उपासना या दोघांनाही हैदराबाद एअरपोर्टवर निळ्या व काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये पाहिले गेले. त्यानंतर जामनगर येथील दोघांच्याही सुंदर लूकचे फोटोही शेअर केले आहेत. रामचरण हा आता ‘गेम चेंजर’ या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका करणार आहे. हा चित्रपट तेलगू भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.