सध्या सोशल मीडियावर सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनची. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या काही दिवस आधी जामनगरध्ये प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन केले गेले आहे. १ ते ३ मार्चपर्यंत या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमाचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी रडताना दिसत आहेत. लेक अनंत अंबानी यांचे भाषण ऐकून वडील मुकेश अंबानी खूपच भावुक झाले व तत्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहायला लागले.
यावेळी अनंत अंबानीने असं म्हटलं की, “माझ्या आईने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माझ्या लग्नाच्या या प्री-वेडिंग फंक्शनसाठी ती गेल्या चार महिन्यांपासून १८-१९ तास काम करत आहे. माझ्या आईचा मी आभारी आहे जिने हे सर्व केले. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना ईथे आल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देतो. तुम्ही सगळे जामनगरला आला आहात. पण यादरम्यान तुम्हाला काही अडचण आली असेल तर क्षमा करावी.”
आणखी वाचा – “माझ्या आईला जाऊन…”, मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “शरीराने ती आमच्यात नाही पण…”
यापुढे आपल्या आई-वडिलांविषयी भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “माझ्या आरोग्याविषयी अनेक अडचणी असूनही, माझ्या आई-वडिलांनी मला कधीही वेगळे वाटू दिले नाही. ते सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला त्यांनी कायमच धीर दिला. वेळोवेळी माझे मनोबल वाढवले. तसेच मी स्वतःला भाग्यवान समजतो की, माझ्या आयुष्याची साथीदार म्हणून मला राधिकासारखी मुलगी मिळाली.” लेकाचे हे शब्द ऐकताच मुकेश अंबानींणा अश्रू अनावर झाले आणि ते रडू लागले.
दरम्यान, मुकेश अंबानींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पैसाच सर्व काही नसतं. खूप पैसे असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातही अनेक समस्या असतात हे आज कळलं, माणूस कितीही श्रीमंत असला तरी प्रत्येक बाप आपल्या लेकाविषयी भावुक होतोच अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.