शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…तेव्हा दादा कोंडकेंना उषा नाईक यांना पुरस्कार दिलेला पटला नाही; अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “उषा चव्हाणांसाठी त्यांनी…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 2, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Usha Naik revealed that Dada Kondke did not want to give me the award

...तेव्हा दादा कोंडकेंना उषा नाईक यांना पुरस्कार दिलेला पटला नाही; अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाल्या, "उषा चव्हाणांसाठी त्यांनी..."

कोणत्याही कलाकारासाठी पुरस्कार हा महत्वाचाच असतो. मात्र कोणत्याही पुरस्कराची अपेक्षा न करता प्रत्येक कलाकार काम करत असतो. या पुरस्कारांमुळे प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन मिळत असते. मात्र कधीकधी हे पुरस्कार मिळण्यात दुजाभाव केला जातो. याविषयी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी एक खुलासा केला आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीदरम्यान उषा नाईक यांनी हा खुलासा केला आहे.  खरंतर पुरस्कार मिळणं ही प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाची मिळालेली पोचपावती असते. अशातच उषा नाईक यांना नुकताच ‘व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार’ मिळाला. यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही पुरस्कारांविषयी उषा नाईक यांनी भाष्य केले.

यावेळी उषा नाईक असं म्हणाल्या की, “‘कलावंतीन’, ‘हळदी कुंकू’, ‘सुशीला’ अशा काही चित्रपटांसाठी मला तेव्हा पुरस्कार मिळणार होता. त्यावेळी त्यागराज पेंढारकर मला म्हणाले होते की, “तुला पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही भांडत आहोत”. तेव्हा दादा कोंडकेंना त्यांच्या ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या चित्रपटासाठी उषा चव्हाण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा होता. यासाठी त्यांचं तेव्हा काही मंत्र्यांशी संगनमत चाललं होतं. माझ्यापाठी तेव्हा कुणी गॉडफादर नव्हता. परीक्षक मात्र माझ्या बाजूने होते. परीक्षकांना माझ्यावर अन्याय होऊ नये असं वाटत होतं. तेव्हा आम्ही तिला सहाय्यक म्हणून पुरस्कार देतो. यापुढेही तिला पुरस्कार मिळतीलच असं ठरलं. पण परीक्षकांनी “सहाय्यक पुरस्कार नाही, तर मग कोणताच पुरस्कार देऊ नये. तुम्हाला ज्यांना पुरस्कार द्यायचा आहे, त्यांना द्या” असं सांगून पुरस्कार देण्यावर बहिष्कार टाकला”.

आणखी वाचा – “माझ्या आईला जाऊन…”, मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “शरीराने ती आमच्यात नाही पण…”

यापुढे त्या असं म्हणाल्या की, “तेव्हा परीक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे याच्यातून आता मार्ग काय काढायचा असं ठरलं. दादा कोंडके मात्र उषा चव्हाण यांना पुरस्कार देण्यावर ठाम होते. तेव्हा दादांचं तसं प्रस्थचं होतं. तेव्हा मग मला सहाय्यक किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार न देता विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार देण्याचं ठरलं. मग त्या वर्षापासून ‘विशेष अभिनेत्री’ हा पुरस्कार जाहीर झाला आणि तो मला व अशोक सराफ यांना मिळाला”.

आणखी वाचा – Video : घोडेस्वारी, निवांत क्षण अन्…; लग्नाला एक महिना पूर्ण होताच शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, उषा नाईक यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमधून आपल्या अभिनयांची छाप सोडली आहे. उषा नाईक यांनी ‘दैव देते’, ‘येऊ का घरात’, ‘राखणदार’, ‘भुजंग’, ‘हळदी कुंकू’, ‘एक हजाराची नोट’, ‘सत्वपरीक्षा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.   

Tags: dada kondkeentertainment newsLate Actormarathi entertainment newsMarathi newsSenior Marathi ActressUsha Naikउषा नाईकज्येष्ठ मराठी अभिनेत्रीदादा कोंडकेदिवंगत अभिनेतेमनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Dattu More On Wife

ठाण्यात सुरु केलं नवं क्लिनिक, बायकोचं यश पाहून भारावला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे, कौतुक करत म्हणाला, "नवीन सुरुवात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.