दाक्षिणात्य कलाकार नागा चैतन्य सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अभिनेत्री शोभिता धूलिपालाबरोबर तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांचाही साखरपुडा थाटामाटात संपन्न झाला. त्यांचे फोटो जेव्हा समोर आले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता त्यांच्या लग्नाच्या तयारीचे काही फोटोदेखील समोर आले आहेत. फोटो पाहून सगळ्यांनी नागा चैतन्य व शोभिताला शुभेच्छा व आणि आशीर्वाद दिले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये शोभिता गोधुमा रायी पसुपू अनुष्ठानचे फोटो पोस्ट केले आहे. यामध्ये दाक्षिणात्य पद्धतीने रिती-रिवाज करताना दिसत आहे. शोभिताच्या सर्व फोटोंना खूप पसंती मिळाली आहे. (naga chaitanya wedding)
शोभिता इन्स्टाग्रामवर १०-१२ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती रेशीम गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तसेच सोन्याचे दागिनेदेखील घातले आहेत. यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडताना दिसत आहे. तसेच तिच्या हातात हळददेखील आहे. ही परंपरा दोन्ही कुटुंब एकत्र येऊन करतात.
शोभिताने हे फोटो शेअर करत लिहिले की, “गोधुमा रायी पसुपू अनुष्ठान आणि शेवटी तो दिवस आला”. अभिनेत्रीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “सौभाग्यवती भव”, तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, “समंथाचा शाप तुझी कधीही पाठ सोडणार नाही”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “एक चांगले कुटुंबं उद्ध्वस्त करुन नातं सुरु केलं आहेस”. अनेकांनी तिच्या सौंदर्याची तारीफदेखील केली आहे.
नागा चैतन्यचे शोभिताबरोबर दुसरं लग्न आहे. याआधी त्याचे लग्न समंथाबरोबर झाले होते. २०१७ साली ते लग्नबंधनात अडकले होते आणि २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. नागाने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटानंतर नैराश्य आल्याचे सांगितले होते. तसेच समंथानेदेखील बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार होतो असेही सांगितले होते. मात्र ठरवल्याप्रमाणे काहीचं झालं नाही. दरम्यान समंथा आता सुखाने आयुष्य जगत असून अनेक चित्रपटांमध्ये सुपरहिट भूमिका करत असल्याचेही दिसून येते.