रविवारी सर्वत्र करवा चौथचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. पतीला दिर्घआयुष्य मिळावे म्हणून स्त्रिया करवा चौथचं व्रत करतात. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्राचं दर्शन घेऊन पतीच्या हाताने पाणी पिऊन हा उपवास सोडतात. बॉलिवूडसह काही मराठी अभिनेत्रींनीदेखील या करवा चौथचा उपवास केला होता. यापैकी एक अभिनेत्री व निर्माती म्हणजेच श्वेता शिंदे. मराठी-हिंदी मालिकांमधून श्वेता शिंदे हे नाव घराघरांत पोहोचले आहे. (Shweta Shinde Karwa Chauth)
मनोरंजन विश्वात अभिनेत्री व निर्माती म्हणून लोकप्रिय असणारी श्वेता शिंदे सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर पारंपरिक तसंच वेस्टर्न लुकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच श्वेताने करवा चौथच्या निमित्ताने काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह तिने सर्वांना शुभ करवा चौथ असं म्हणत शुभेच्छादेखील दिल्या आहेत. या फोटोमध्ये श्वेताने लाल रंगाची साडी परिधान केली असून तिच्या नवऱ्याने जांभळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
श्वेताने शेअर केलेल्या या फोटो व व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. श्वेताच्या नवऱ्याबद्दल बोलायचे झाले तर श्वेताचा नवरा हिंदीमध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘अपराधी कौन’ या मालिकेच्या सेटवर श्वेता व संदीप भन्साळीची ओळख झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर २००७ साली दोघे विवाहबद्ध झाले. श्वेताचा पती संदीप सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. त्यांचा कपडयांचा मोठा व्यवसाय आहे.
आणखी वाचा – Video : सूरज चव्हाणने केदार शिंदेंची घेतली भेट, घरी बोलवत केला विशेष पाहुणचार, दिली ‘ही’ खास भेटवस्तू
दरम्यान, ‘अवंतिका’, ‘अवाघाची हा संसार’, ‘लक्ष्य’ आणि ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये श्वेता शिंदेने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. श्वेताने मिळालेल्या भूमिकेला न्याय दिला. तिने वठवलेली नकारात्मक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिनयाकडून श्वेता शिंदेने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. ‘लागीर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘देवमाणूस या मालिकांची यशस्वी निर्मिती केली.