Appi Aamchi Collector : झी मराठीवर अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने तब्बल आठ वर्षांचा लीप घेतला होता. लीपपूर्वी सरकारनेच अर्जुनच्या आईचा खून केल्याचे सत्य सर्वांसमोर आलेले. विशेष म्हणजे हे सत्य अप्पीला माहिती असून सुद्धा तिने आपल्यापासून ते लपवलं यामुळे अर्जुनने तिच्यापासून दुरावा निर्माण केलेला. म्हणूनच ते दोघं वेगळे राहू लागलेले. आठ वर्षानंतर अप्पी तिचा मुलगा अमोलला घेऊन पुन्हा एकदा पुण्यात राहायला येते आणि मग अर्जुनची त्यांच्याशी भेट होते. (Appi Aamchi Collector Serial Update)
अमोलमुळे अप्पी व अर्जुन एकमेकांबरोबर राहू लागतात, पण तरीही त्यांना एकमेकांच्या काही गोष्टी पटत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडत असतात. अप्पी व अर्जुन आपापल्या तत्त्वांवर ठाम राहत असल्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडत असतात. पण अमोल त्यांना सतत एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. नुकताच मालिकेत अमोलला आजार झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्याच्याकडे फक्त काहीच दिवस शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र तरीही अमोल आपल्या आई-बाबांना एकत्र आणत आहे.
अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यातून अप्पी व अर्जुन यांना अमोल पुन्हा एकदा एकत्र आणत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरात अर्जुन व अप्पी एकत्र असताना अमोल बाहेर जातो आणि बाहेरून दरवाज्याची कडी लावतो आणि अखेर अनेक दिवस अबोल असलेले अप्पी-अर्जुन पुन्हा एकदा एकमेकांशी बोलू लागतात. यावेळी अप्प्पी अर्जुनला असं म्हणते की, “अर्जुन जे काही झालं त्यासाठी मी सॉरी म्हणते”.
यापुढे अर्जुनही तिला असं म्हणतो की, “त्यावेळी मी नुसता राग-राग न करता तुला समजून घेतलं असतं, तर तुझ्या आणि अमोलबरोबरच्या सात वर्षांना मी मुकलो नसतो”. यापुढे तो “आपण दोघे एकत्र राहू आणि अमोलला एकत्र मोठं करु” असं म्हणतो. यानंतर अप्पी व अर्जुन दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अनेकांनी अशा अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – श्वेता शिंदेंनीही सेलिब्रिट केला करवाचौथ, नवऱ्यासह दिल्या खास पोझ, पारंपरिक लूकमधील फोटो समोर
दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत नुकत्याच आलेल्या या नवीन ट्विस्टची गेले काही दिवस प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अप्पी व अर्जुन यांनी एकत्र यावे असे अनेक चाहते मंडळी म्हणत होते. अखेर चाहत्यांनी ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.