Payal Malik Kritika Malik Armaan Malik : ‘बिग बॉस OTT २’ मधील सगळेच स्पर्धक चर्चेत राहिलेले दिसले. या पर्वातील लोकप्रिय युट्युबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. नेहमीच हे मलिक कुटुंब चर्चेत असलेलं पाहायला मिळालं आहे. अशातच अरमान मलिकच्या पत्नी कृतिका मलिक आणि पायल मलिक यांनी करवा चौथ उपवास केला असल्याचं समोर आलं. त्याचे सर्व फोटो व व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करण्यात आले होते. या जोडप्याने पूजेदरम्यानची एक झलक ते रात्री चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडण्यापर्यंतचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून लोकांनी त्यांच्या काही चुका लक्षात घेत त्यांच्यावर टीका केली आहे.
इतरांप्रमाणेच पायल व कृतिका यांनीही पती अरमानच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास केला. तिघेही लाल रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. कॅप्शनमध्ये पायल व कृतिकाने “माझे कुटुंब, माझे जीवन”, असे लिहिले आहे. करवा चौथच्या पूजेदरम्यान, कृतिका व पायलने मरुन सलवार-कमीज आणि पांढरा दुपट्टा परिधान केला होता, ज्यावर लोकांनी त्यांना सल्ला दिला की विवाहित महिलांनी पांढरे कपडे घालू नयेत.
त्याच वेळी, चंद्राला अर्घ देताना तिघांनीही एक चूक केली, जी लोकांनी लगेच पकडली. अरमान-पायल आणि कृतिका यांनी पायात बूट घातले होते. अरमानने बूट घातले होते आणि दोघांनीही चपला घातल्या होत्या. या व्हिडीओमध्ये आरती करुन पाणी अर्पण केल्यानंतर पायलने अरमानच्या पायालाही स्पर्श केला. आता हे सर्व पाहून लोक संतापले आणि त्यांना कमेंटमध्ये सल्ले देऊ लागले. काहींना त्यांच्या या वागणुकीचा रागही आला.
एका यूजरने लिहिले आहे की, “अरमान रामलीलामधील रावणसारखा दिसत आहे”. एकजण म्हणाला, “पायल जी, पूजा करताना चपला काढा. मग ते रील असो वा खरंखुरं”. एकजण म्हणाला, “चप्पल घालून कोण पूजा करतं”. तर एकाने लिहिले आहे की, “तुम्ही तुमचे बूट काढायला हवे होते”. तर पांढऱ्या दुपट्ट्यासाठी लोकांनी ‘करवा चौथला पांढरा दुपट्टा घालू नका’ असे लिहिले आहे. एकजण म्हणाला, “आज कोणत्या नवरीने पांढरे कपडे घालायचे?”, असं म्हणत त्यांना ट्रोल केलं आहे.