तमिळ चित्रपटातील विनोदाचे बादशाह नारायण शेषु यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवारी २६ मार्च रोजी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अशातच दिग्दर्शक के. जॉनसन यांनी शेषु यांच्याबद्दल एक खुलासा केला आहे. ‘लोलू सभा शेषु’ या प्रेमळ नावाने त्यांचे चाहते त्यांना हाक मारत असत. (lakshminarayan sheshu death reason)
शेषु यांना पेरोड टीव्ही सीरिज ‘लोलु सभा’ मुळे अधिक ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी एका दारुड्याची भूमिका केली होती. या भूमिकेला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले होते. जॉनसन व शेषु यांची मैत्री या चित्रपटामुळे अधिक घट्ट झाली होती. तसेच शेषु यांनी कोरोंना काळामध्ये लोकांची खूप मदत केली होती मात्र जेव्हा त्यांच्यावर वेळ आली तेव्हा मात्र त्यांची कोणीही मदत केली नाही.
जॉनसन यांनी सांगितले की, “जेव्हा मी सेटवर चांगल्या मूडमध्ये असायचो तेव्हा मी त्यांना शेषु मामा म्हणून हाक मारायचो. हे ऐकून त्यांना खूप हसू यायचे. ते खूप दयावान व प्रेमळ होते. जर कोणाला २५ किलो तांदळाची गरज असेल तर सर्वांकडून एकत्र करत व ते वाटत असत. तसेच त्यांनी आपल्या बाइकला देखील एक स्पीकर लावला होता आणि सर्वांना मास्क लावावा अशी घोषणाही ते करत असत”.
पुढे ते म्हणाले की, “अशा लोकांना कोणाकडून मदत मिळत नाही हे ऐकून खूप दु:ख होते. जेव्हा त्यांना अधिक गरज होती तेव्हा त्यांच्याबरोबर कोणीही नव्हते. शेषु यांना १० लाख रुपयांची गरज होती मात्र तेही त्यांना मिळू शकले नाहीत त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जर मोठे कलाकार त्यांच्या मदतीला धावून आले असते टर कदाचित त्यांचा जीव वाचला असता”.
१५ मार्च रोजी शेषु यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच्यावर उपचारही सुरु होते. पण उपचारादरम्याने २६ मार्च रोजी त्यांचे निधन झाले.