सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जगण्याची आशाही सोडली, मृत्यू जवळून पाहिला अन्…; कॅन्सरनंतर स्टेजवर पहिल्यांदाच आल्यावर अतुल परचुरेंना रडू कोसळलं, कलाकारांचेही डोळे पाणावले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 29, 2024 | 12:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Atul parchure on zee natya gaurav award

जगण्याची आशाही सोडली, मृत्यू जवळून पाहिला अन्...; कॅन्सरनंतर स्टेजवर पहिल्यांदाच आल्यावर अतुल परचुरेंना रडू कोसळलं, कलाकारांचेही डोळे पाणावले

‘झी मराठी’ वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच काही ना काही खास घेऊन येत असते. सध्या ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. ‘झी नाट्य गौरव’ सोहळ्यात अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावत या कार्यक्रमाची शान वाढविली. कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. लवकरच ‘झी नाट्य गौरव अवॉर्ड’ शो ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या अवॉर्ड शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Atul parchure on zee natya gaurav award)

दरम्यान, या अवॉर्ड शोमधील एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रोमोमध्ये अतुल परचुरे यांची ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्याला खास उपस्थिती असल्याची पाहायला मिळत आहे. एका अवलियाची गोष्ट असं म्हणत अतुल परचुरे यांची रंगमंचावर झालेल्या एंट्रीला कलाकारांसह, उपस्थितांनाही टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय. अतुल परचुरे यांच्यासह सुनील बर्वे, महेश मांजरेकर, आनंद इंगळे या कलाकार मंडळींनी सादरीकरण केलं असल्याचं पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाल्या, “६० वर्षांचा प्रवास संपला अन्…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यानंतर ज्येष्ठ कलाकार मंडळींच्या उपस्थितीत अतुल परचुरे यांचा सन्मान करण्यात आल्याचं प्रोमोमध्ये दिसतंय. यावेळी ते असंही बोलताना दिसत आहे की, “बरोबर एक वर्षांपूर्वी मी बरं होऊ शकेन की नाही याची मला स्वतःलाही खात्री नव्हती, पण मी आज इथे आहे तो तुमच्यामुळे आहे”, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांचे सर्व जवळचे कलाकार मित्र मंडळी त्यांची गळाभेट घेताना दिसले. सन्मान झाल्यानंतर अतुल परचुरे यांनी डोकं टेकवून रंगमंचाचा आशीर्वाद घेतला.

आणखी वाचा – आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; गोविंदाकडे आहे इतक्या कोटी रुपयांची संपत्ती, शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर कमाई समोर

प्रेक्षकांच्या आयुष्यात विनोदाला जिवंत ठेवणारे अभिनेते अतुल परचुरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अतुल यांनी कर्करोगावर मात केली असून त्यांच्या या जिद्दीची व संघर्षाची कहाणी अतिशय आशयघन आहे. अतुल यांच्यावर कर्करोगाचे उपचार हे चुकीचे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर त्यांनी सेकंड ओपिनियन घेत नवीन उपचार घेत हा लढा पार पाडला. आजारपणानंतर आता अतुल परचुरे यांनी सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास पुन्हा एकदा सुरु केला आहे.

Tags: atul parchureAtul parchure on zee natya gaurav awardmarathi actorZee Natya Gaurav Award
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Saregamapa Little Champs fame Kartiki Gaikwad is pregnant and a her pregnancy video viral on social media

Video : लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, नवऱ्यासह धमाकेदार एन्ट्री अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.