शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; गोविंदाकडे आहे इतक्या कोटी रुपयांची संपत्ती, शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर कमाई समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 29, 2024 | 11:22 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Govinda Net Worth

आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; गोविंदाकडे आहे इतक्या कोटी रुपयांची संपत्ती, शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर कमाई समोर

बॉलिवूडमध्ये ‘हिरो नंबर १’ अशी ओळख असलेल्या अभिनेता गोविंदा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आजवर गोविंदाने त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सध्या गोविंदा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आला असल्याचं पाहायला मिळत आहे. २००४ मध्ये त्यांने काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून संसदेत निवडूनही आला. आता दोन दशकांनंतर, त्याने पुन्हा एकदा राजकीय जगात प्रवेश केला आहे. यावेळी अभिनेता शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक २०२३ लढवण्याची शक्यता आहे. (Govinda Net Worth)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलं. गोविंदा चित्रपटांपासून ब्रँड एंडोर्समेंटपर्यंत करोडोंची कमाई करतो. अभिनेता गोविंदा अनेक वर्षांनंतर राजकारणात परतला असून, तो २०२४ ची लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढणार असल्याच्या चर्चा आहेत. राजकारण व चित्रपटांपासून दीर्घकाळ दूर राहिलेला अभिनेता गोविंदा यांची संपत्ती कोटींच्या घरात आहे. २००४ मध्ये Myneta.info वर निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, गोविंदाने तेव्हा त्यांची एकूण संपत्ती १४ कोटी रुपये असल्याचे घोषित केले होते. पत्रकारांच्या मते, आता २० वर्षांनंतर त्यांची संपत्ती १८ दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे १५० कोटी रुपये आहे.

आणखी वाचा – हार्दिक जोशीने खरेदी केली नवीकोरी महागडी कार, वडिलांना वाढदिवसानिमित्त भेटवस्तू दिली अन्…; फोटो व्हायरल

गोविंदाला बॉलिवूडचा ‘हीरो नंबर १’ म्हणून ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना चाहते बनवणाऱ्या गोविंदाचा चित्रपटांच्या कमाईत मोठा वाटा आहे, तर तो ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही भरपूर कमाई करतो. या सर्व माध्यमातून गोविंदा वर्षाला सुमारे १२ कोटी रुपये कमावतो आणि त्याचे मासिक उत्पन्न सुमारे १ कोटी रुपये आहे. गोविंदा त्यांचं शानदार आयुष्य जगत असल्याचा अंदाज मुंबईतील आलिशान घराकडे पाहून येतो. मुंबईत त्याच्या दोन आलिशान आणि महागड्या मालमत्ता आहेत. यापैकी एक जुहूच्या रुईया पार्कमध्ये आहे, तर दुसरा मड आयलंडमध्ये आहे. त्यांच्या घराची अंदाजे किंमत १६ कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांनी अनेक रिअल इस्टेट प्रकल्पही त्यांच्या नावे आहेत.

आणखी वाचा – सुरुची अडारकर व पियुष रानडेचे रोमँटिक क्षण, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त छोटी ट्रिप, भरपूर लाड अन्…; व्हिडीओ व्हायरल

एका चित्रपटासाठी गोविंदा सुमारे ५ ते ६ कोटी रुपये मानधन घेतो. तर एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी तो सुमारे २ कोटी रुपये आकारतो. त्याच्या आलिशान लाइफस्टाइलमध्ये त्याचे कार कलेक्शनही पाहायला मिळते. रिपोर्टनुसार, त्याच्याकडे अनेक आलिशान व महागड्या गाड्या आहेत, ज्यात मित्सुबिशी लान्सर, फोर्ड एंडेव्हर सारख्या गाड्यांचा समावेश आहे.

Tags: bollywood gossipentertainmentgovindaGovinda Net Worth
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Shubha Khote's husband Dinesh Balsawar passed away

सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाल्या, "६० वर्षांचा प्रवास संपला अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.