शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खोकला-उलट्या झाल्या, सैरभैर पळू लागले अन्… ‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना घडला विचित्र प्रकार, नक्की झालं तरी काय?

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 6, 2024 | 2:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
pushpa 2 movie

'पुष्पा २' चित्रपटादरम्यान नक्की काय घडलं?

दाक्षिणात्य बहूचर्चित चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काल (५ डिसेंबर २०२४) रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर एका दिवसांत या चित्रपटाने ६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले. हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर नाव कोरले. आगाऊ बुकींगमध्येच या चित्रपटाने धुमाकूळ घातला असला, तरी थिएटरमध्ये आल्यानंतर ‘पुष्पा २’ने खळबळ उडवून दिली. या चित्रपटातील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच आता चित्रपटाबद्दलची एक बातमी समोर आली आहे. (pushpa 2 movie)

हैद्राबादमध्ये चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरु असताना खूप गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ही चर्चा सुरु असतानाच आता एक नवीन बातमी समोर आली आहे.  मुंबई येथील गेटी गॅलक्सी चित्रपटगृहात एका प्रेक्षकाने इतर प्रेक्षकांवर पेपर स्प्रे मारला. ज्यामुळे २० मिनिटांसाठी चित्रपट थांबवण्यात आला.

आणखी वाचा – “बुरखा घाल, नमाज पठण कर”, शाहरुख खानने पत्नी गौरीकडे केली मागणी, कुटुंबियांनाही बसला धक्का, नेमकं काय झालं?

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

‘आयएएनएस’ रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने अचानक चित्रपटगृहांमध्ये एका व्यक्तीने पेपर स्प्रे मारल्यानंतर तिथे असलेल्या लोकांना खोकला येऊ लागला आणि काहींना उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर लगेचच हा शो थांबवण्यात आला. याबद्दल नंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. या पूर्ण घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. यामध्ये चित्रपटगृहातील लोकांची वाईट अवस्था दिसून येत आहे.

आणखी वाचा – फुलांचं डेकोरेशन, केक अन्…; सुरुची अडारकर व पियुष रानडे यांनी घरच्या घरीच साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस, फोटो समोर

अल्लू अर्जुनही चित्रपटगृहात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात करुन सुरक्षा वाढवली. अल्लू अर्जुन त्याच्या कारच्या सनरुफमधून बाहेर येतो आणि गर्दीला हात दाखवतो. या बिग बजेट चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट १० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. पोस्ट-प्रॉडक्शन विलंबामुळे 3D चे प्रकाशन शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आले. यात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदान्ना, फहद फासिलसह अनेक कलाकार आहेत.

Tags: allu arjunmoviepushpa 2
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actor Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkar answered people's questions as to why she is not pursuing a career in the field of entertainment by sharing post.

"मनोरंजन क्षेत्रात करिअर का करत नाही?", लोकांच्या प्रश्नावर प्रथमेशच्या बायकोचं उत्तर, म्हणाली, "चर्चेत राहणं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.