बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचे लग्न होऊन आता जवळपास ३३ वर्षे झाली आहेत. या दोघांनी आंतरधर्मीय लग्न असलं तरी दोघं एकमेकांच्या धर्माचा आदर करतात आणि दोन्ही धर्मातील अनेक सण-उत्सव एकत्र साजरे करतात. गौरी व शाहरुख यांचं आंतरधर्मीय लग्न हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. गौरीने इस्लाम धर्मातील शाहरुखशी लग्न केलं असलं तरी लग्नानंतर तिने धर्मांतर केलं नाही. लग्नाच्या वेळी गौरीच्या कुटुंबीयांना तिची फार काळजी वाटत होती. लग्नानंतर शाहरुख तिला धर्मांतर करण्यास भाग पाडेल, असं त्यांना वाटत होतं. (Shah Rukh Khan demanded his wife Gauri to wear burqa)
सुरुवातीला गौरीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. “माझ्या कुटुंबीयांशी ओळख करून देताना मी शाहरुखचं नाव अभिनव असं सांगितलं होतं. जेणेकरुन तो हिंदू आहे असं त्यांना वाटेल. पण ते खूपच बालिश आणि मूर्खपणाचं होतं”, असं गौरी एका मुलाखतीत म्हणाली होती. तसंच फरिदा जलाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखनेही त्यांच्या लग्नाचा एक खास किस्सा सांगितला होता. यावेळी त्याने गौरीला नमाज पठन कर बुरखा घाल असं म्हणत गौरीबरोबर एक मस्करी केली होती. ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांना धक्काचा बसला होता.
याबद्दल त्याने असं म्हटलं होतं की “मला आठवतंय की, गौरीचे पारंपरिक विचारांचे कुटुंबीय एकमेकांशी कुजबुज करत होते की, मुलगा मुस्लीम आहे. तो तिचं नाव बदलणार का? लग्नानंतर ती पण मुस्लीम होईल का? या सर्व चर्चा ऐकून मी मस्करीत म्हटलं, चल गौरी… तुझा बुरखा घाल आणि नमाज पठण करायला बस. त्यावेळी संपूर्ण कुटुंब आम्हा दोघांकडे बघत होतं. मी गौरीचं धर्मांतर आधीच केलं की काय, असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यानंतर मी अजून त्यांची मस्करी केली. त्यांना म्हटलं, यापुढे ती नेहमी बुरखा घालणार आहे तिचं नाव आयेशा असं असेल”.
आणखी वाचा – आईच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट, म्हणाला, “मला या जगात आणल्याबद्दल…”
दरम्यान, शाहरुख खान हा मुस्लिम आणि गौरी हिंदू आहे. तेव्हाच्या काळात या धर्माच्या कपलला लग्न करणं आता वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यातच शाहरुख जेव्हा गौरीच्या प्रेमात पडला तेव्हा तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होता. दोघांना लग्न करायचे होते. मात्र गौरीच्या पालकांकडून या लग्नासाठी परवानगी मिळवणे खूपच कठीण होते. अखेर शाहरुखने गौरीच्या पालकांना त्यांच्या लग्नासाठी राजी केलं आणि त्यांचं लग्न आनंदात पार पडलं.