दाक्षिणात्य बहूचर्चित चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काल (५ डिसेंबर २०२४) रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर एका दिवसांत या चित्रपटाने ६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले. हिंदी भाषेतही सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर नाव कोरले. आगाऊ बुकींगमध्येच या चित्रपटाने धुमाकूळ घातला असला, तरी थिएटरमध्ये आल्यानंतर ‘पुष्पा २’ने खळबळ उडवून दिली. या चित्रपटातील सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच आता चित्रपटाबद्दलची एक बातमी समोर आली आहे. (pushpa 2 movie)
हैद्राबादमध्ये चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग सुरु असताना खूप गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरीमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ही चर्चा सुरु असतानाच आता एक नवीन बातमी समोर आली आहे. मुंबई येथील गेटी गॅलक्सी चित्रपटगृहात एका प्रेक्षकाने इतर प्रेक्षकांवर पेपर स्प्रे मारला. ज्यामुळे २० मिनिटांसाठी चित्रपट थांबवण्यात आला.
‘आयएएनएस’ रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने अचानक चित्रपटगृहांमध्ये एका व्यक्तीने पेपर स्प्रे मारल्यानंतर तिथे असलेल्या लोकांना खोकला येऊ लागला आणि काहींना उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर लगेचच हा शो थांबवण्यात आला. याबद्दल नंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. या पूर्ण घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. यामध्ये चित्रपटगृहातील लोकांची वाईट अवस्था दिसून येत आहे.
अल्लू अर्जुनही चित्रपटगृहात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात करुन सुरक्षा वाढवली. अल्लू अर्जुन त्याच्या कारच्या सनरुफमधून बाहेर येतो आणि गर्दीला हात दाखवतो. या बिग बजेट चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा हा सिक्वेल आहे. हा चित्रपट १० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. पोस्ट-प्रॉडक्शन विलंबामुळे 3D चे प्रकाशन शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आले. यात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदान्ना, फहद फासिलसह अनेक कलाकार आहेत.