Suruchi Adarkar And Piyush Ranade Wedding Anniversary : सिनेसृष्टीत सध्या कलाकारांची लग्न चर्चेत आहेत. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच गेल्यावर्षी एका मराठमोळ्या कलाकारांनी गुपचूप विवाहसोहळा उरकल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर थेट लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना खूप मोठा धक्का दिला. लग्नानंतर पियुष व सुरुची बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगली. लग्नानंतर दोघांचा सुखी संसार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर दोघेही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
सुरुची व पियुष यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. शाही थाटामाटात व अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला. आता दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच त्यांनी या खास दिवसाचं घरच्या घरीच सेलिब्रेशन केलेलं पाहायला मिळत आहे. फुलांचं डेकोरेशन, वार्म लाईट आणि love असं लिहिलेला केक आणून त्यांनी हे सेलिब्रेशन केलं. त्यांच्या या छोट्याश्या आणि स्पेशल सेलिब्रेशनचा फोटो दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला आहे. सुरुचीने हा फोटो पोस्ट करत, “तुम्हाला फक्त प्रेमाची गरज आहे”, असं म्हटलं आहे.
सुरुची व पियुष यांनी कधीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही. तर थेट लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच त्याच्या मित्रमंडळींनीही त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुरुची व पियुष दोघेही नुकतेच अभिनेता अभिषेक गांवकरच्या लग्नाला एकत्र दिसले होते. यावेळी दोघे मालवण, गोवा येथे फिरुन आले. तेथे फिरतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ ती पोस्ट करताना दिसली.
सुरुचीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर सध्या ती अभिनयक्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळते. मात्र याआधी ती ‘का रे दुरावा’, डॉ. अंजली – झेप स्वप्नांची’ , ‘एक घर मंतरलेलं’ अशा मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘डॉ. अंजली…’ या मालिकेदरम्यान पीयूष व सुरुचीची ओळख झाली होती. त्यावेळी त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकले.