‘बालक पालक’, ‘टाइमपास’, ‘उर्फी’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब काही दिवसांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकला. प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. अजूनही त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत. दोघेही सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. प्रथमेशची पत्नी क्षितिजा ही मनोरंजन क्षेत्रातली नसली तरी ती अनेकदा येते. प्रथमेशबरोबर ती अनेकदा चित्रपटाच्या प्रीमियरला किंवा काही सोहळ्यानिमित्त भेटी देत असते. तसंच सोशल मीडियावरही ती चांगले लिखाण करताना दिसते. अशातच तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Kshitija Ghosalkar Instagram post)
क्षितिजाने ती काम करत असलेल्या ठिकाणाहून एक फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्टखाली तिने एक कॅप्शन लिहिलं आहे. यामध्ये तिने असं म्हटलं की, “लोक मला नेहमी विचारतात की, ‘तुझी मॉडेलिंग पार्श्वभूमी आणि चित्रपटसृष्टीतील नवरा असल्याने मनोरंजन क्षेत्रात करिअर का करत नाही?’ यावर माझे उत्तर सोपे पण शक्तिशाली आहे, ते म्हणजे माझी आवड. मी मॉडेलिंग आणि कंटेंट क्रिएशनचा छंद म्हणून आनंद घेत असताना, माझे काम हे तरुणांना सशक्त बनवणे, समुदाय विकासाला पाठिंबा देणे आणि इच्छुकांना प्रशिक्षण देणे हे आहे. हे फक्त नोकरीनिमित्त नाही तर ते माझे उद्दिष्ट आहे”.
आणखी वाचा – “बुरखा घाल, नमाज पठण कर”, शाहरुख खानने पत्नी गौरीकडे केली मागणी, कुटुंबियांनाही बसला धक्का, नेमकं काय झालं?
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मला माझ्या ०९ ते ०५ कामात आनंद मिळतो. कारण यामुळे रचना, स्थिरता आणि फरक करण्याची पूर्तता होते. माझ्यासाठी, यश हे चर्चेत राहणे नाही. हे इतरांच्या आयुष्यात प्रकाश टाकणे आहे. त्यांना त्यांचा मार्ग शोधण्यात मदत करणे आणि आयुष्यात प्रभाव निर्माण करणे हे आहे. मला कोणत्याही स्टारडम, लोकप्रियता आणि प्रसिद्धीपेक्षा माझे उद्देश पूर्ण करण्याबद्दल आहे”.
दरम्यान, प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.