गेल्या काही दिवसांपासून कलाक्षेत्रामधून एकामागोमाग एक दुःखद घटना समोर येत आहेत. हिंदी, मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील काही कलाकारांना मागच्या काही दिवसांत आपला जीव गमवावा लागला. आता अशीच एक दुःखद बातमी समोर आल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हादरुन गेली आहे. प्रसिद्ध मल्याळम चित्रपट व टीव्ही अभिनेत्री अपर्णा पी नायरचं निधन झालं आहे. ती ३१ वर्षांची होती. अपर्णाच्या पश्चात पती व दोन मुलं असा परिवार आहे. गुरुवारी (३१ ऑगस्ट) राहत्या घरी अपर्णा मृतावस्थेत आढळली. तिच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला दुःखद धक्का बसला आहे.
गुरुवारी सायंकाळी अपर्णाला बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर तिला लगेचच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. करमना पोलिसांनी अपर्णाच्या मृत्यूमाग कशाप्रकारे झालं हे सांगितलं आहे. अनैसर्गिक रित्या तिचं निधन झालं असल्याचं समोर आलं आहे. तिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं.
‘चंदनमाळा’, ‘आत्मसखी’, ‘मैथिली वेंदुम वरुम’, ‘देवस्पर्शम’ सारख्या मालिकांमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली. शिवाय ‘मेघातीर्थम’, ‘मुथुगौ’, ‘आचायंस’, ‘कोडथी समक्षम बालन वकील’, ‘कल्की’ आदी चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. अपर्णाच्या निधनानंतर तिचे चाहतेही सोशल मीडियाद्वारे हळहळ व्यक्त करत आहेत.
आणखी वाचा – “आली ड्रामेबाझ” उमराहवरून परतलेल्या राखीला नेटकऱ्यांनी केलं पुन्हा ट्रोल; म्हणाले, “नागपूरात वेड्यांसाठी…”
अपर्णा तिच्या सोशल मीडियाद्वारे विविध फोटो व व्हिडीओ शेअर करत होती. मुली व पतीसह तिचे बरेच फोटो इन्स्टाग्रामवर आहेत. तिच्या या फोटो व व्हिडीओवरुनच अपर्णाचं तिच्या कुटुंबियांवर किती प्रेम होतं हे दिसून येतं. अपर्णाच्या निधनानंतर दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील मंडळी तिला श्रद्धांजली वाहत आहेत.