शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठा निर्णय! अभिनय क्षेत्राला रामराम करत थलपती विजयची राजकारणात एण्ट्री, स्वत:च्या पक्षाची केली स्थापना  

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 2, 2024 | 5:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
South actor thalapathy vijay joins politics and he announces his new political party see the details

मोठा निर्णय!, अभिनय क्षेत्राला रामराम करत थलपती विजयची राजकारणात एण्ट्री, स्वत:च्या पक्षाची केली स्थापना

मनोरंजन सृष्टीतील सर्वांसाठी ‘लाइट्स, कॅमेरा अँड अ‍ॅक्शन’ हे तीन शब्द अगदीच महत्त्वाचे आहेत. पण दक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी ‘लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन अँड राजकारण’ हे चार शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा चंदेरी पडदा गाजवलेले अनेक तारे आजपर्यंत राज्याच्या राजकारणात येऊन जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. सी. एन. अण्णादुराई, एम. करुणानिधी, एस. एस. राजेंद्रन, एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांच्या राजकारणातील सक्रिय सहभागानंतर अभिनेते राजनीकांत यांनीही लवकरच राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.

चंदेरी दुनिया गाजवल्यानंतर राजकारणात सक्रिय सहभाग घेणाऱ्यांमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे आणि तो म्हणजे अभिनेता थलपती विजय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला आहे. थलपथी विजयने नुकतंच त्याच्या पक्षाची घोषणा केली आहे ज्याचे नाव ‘तमिलागा वेत्री कझघम’ आहे. निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आली असल्याचेही थलपती विजयने स्पष्ट केलं आहे. विजयचा ‘तमिलागा वेत्री कझघम’ हा पक्ष २०२६ची विधानसभा निवडणुक लढणार आहे. 

#தமிழகவெற்றிகழகம் #TVKVijay https://t.co/Szf7Kdnyvr

— Vijay (@actorvijay) February 2, 2024

आपल्या अधिकृत निवेदनात विजय म्हणाला, “आपल्या पक्षाची नोंदणी ECI कडे करण्यात आली आहे. मी नम्रपणे सांगू इच्छितो की पक्षाच्या महापरिषद आणि कार्यकारिणीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत न लढण्याचा किंवा इतर कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मला एक भ्रष्टाचार मुक्त सेक्युलर आणि प्रगतीवादी सरकार स्थापन करायचं आहे. धार्मिक भेदभाव, जातीय दंगे आणि भ्रष्टाचारावर चालणाऱ्या राजकारणाला मला थांबवायचं आहे”.

आणखी वाचा – “मुला-मुलींना पैशांसाठी…”, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरच्या यात्रेमधील ‘त्या’ मुलांना पाहून सुकन्या मोनेंचा संताप, म्हणाल्या, “हे सगळं संशयस्पद…”

राजकारणात पूर्णपणे वेळ देणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे विजयने चित्रपटविश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकारणात पूर्णपणे लक्ष देता यावे व सक्रिय सहभाग घेण्यासाठी तो चित्रपटविश्वातून ब्रेक घेणार आहे. सध्या विजय हा वेंकट प्रभू यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे, अन् हा चित्रपट त्याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल असंही त्याच्या या निवेदनातून समोर येत आहे.  

आणखी वाचा – शिवानी सुर्वेचं मंगळसूत्र इतर अभिनेत्रींपेक्षा आहे फारच युनिक, डिझाइनने वेधलं लक्ष, खास फोटो व्हायरल

दरम्यान, विजय थलापतीचा चाहता वर्ग मोठा आहे. याशिवाय सामाजिक कार्यातही विजय अग्रेसर असतो. त्यामुळे लोकांमध्ये विजय थलापतीचे काम पोहोचले आहे आणि त्यामुळेच त्याला राजकारणात याचा मोठा फायदा होईल, असे बोलले जात आहे.  

Tags: entertainment newspoliticsPolitics Newssouth actorSouth Entertainment Newsthalapathy vijayथलपती विजयदक्षिण मनोरंजन बातमीदाक्षिणात्य अभिनेतामनोरंजन बातमीराजकारणराजकारण बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Poonam pandey bodyguard shock when he know about actress death and with her since 11 years see details

“तिने दारु पिणं…”, पूनम पांडेच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा, ११ वर्षांपासून होता बरोबर, म्हणाला, “तिच्या घरी गेलो तेव्हा…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.