शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवानी सुर्वेचं मंगळसूत्र इतर अभिनेत्रींपेक्षा आहे फारच युनिक, डिझाइनने वेधलं लक्ष, खास फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 2, 2024 | 4:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shivani surve ajinkya nanaware wedding actress Mangalsutra attracted attention

शिवानी सुर्वेचं मंगळसूत्र इतर अभिनेत्रींपेक्षा आहे फारच युनिक, डिझाइनने वेधलं लक्ष, खास फोटो व्हायरल

मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे ही लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. ३१ जानेवारी रोजी या जोडीने विवाह करत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. गेल्या काही काळापसून ही दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाविषयी साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अशातच या जोडीने ३० जानेवारी रोजी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याविषयी अधिकृतपणे सांगितले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवानी-अजिंक्य ही विवाहबंधनातदेखील अडकले.

शिवानी-अजिंक्य यांच्या लग्नाचा शाही थाटमाट पाहायला मिळाला. दोघांच्या लग्नसोहळ्यातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानीने लग्नासाठी खास फिकट गुलाबी रंगाचा सुंदर नक्षीकाम असलेला लेहेंगा परिधान केला होता, तर अजिंक्यने सफेद रंगाची शेरवाणी परिधान केली होती व डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटादेखील परिधान केला होता. त्यांच्या या लूकची चर्चा सुरू सन अनेकांना त्यांचा हा साधा तरीही साजेसा असा लुक सर्वांनाच आवडला असल्याचे सांगितले आहे.

आणखी वाचा – “मुला-मुलींना पैशांसाठी…”, सोलापूरच्या सिद्धरामेश्वरच्या यात्रेमधील ‘त्या’ मुलांना पाहून सुकन्या मोनेंचा संताप, म्हणाल्या, “हे सगळं संशयस्पद…”

अशातच शिवानीच्या मंगळसूत्रानेदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवानीने तिच्या लग्नात खास मंगळसूत्राची निवड केली असल्याचे पाहायला मिळाले. शिवानीने परिधान केलेल्या मंगळसूत्रात सोन्याच्या तारेभोवती काळे मणी गुंफलेले पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या मंगळसूत्राला दोन वाट्या असल्याचेदेखील पाहायला मिळत आहेत. मंगळसूत्रामध्ये काळे मणी व दोन वाट्या यांना फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे शिवानीने तिच्या लग्नात पारंपरिक मंगळसूत्राची निवड केली. तसेच शिवानीचे ही मंगळसूत्र पारंपरिक असले तरी त्याची डिझाईन ही अगदी मॉडर्न वाटत आहे. त्यामुळे शिवानीचे मंगळसूत्र ही पारंपरिक असले तरी त्याला एक मॉडर्न टच असल्याचेदेखील अनेकांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – वयाच्या ३२व्या वर्षी इतकी संपत्ती मागे ठेऊन गेली पूनम पांडे, एका शोसाठी तब्बल इतके रुपये अन्…; कसं जगत होती आयुष्य?

शिवानी-अजिंक्य यांच्या लग्नाला त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक व मराठी मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळाले. झिम्मा २ या टीममधील अभिनेत्री सुहास जोशी, सायली संजीव व अभिनेता हेमंत ढोमे यांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान, शिवानी-अजिंक्य यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.            

Tags: अजिंक्य ननावरेशिवानी सुर्वेशिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे लग्नमराठी अभिनेतामराठी अभिनेत्रीAjinkya Nanavaremarathi actormarathi actressShivani Ajinkya marriageshivani surveshivani surve and ajinkya nanaware wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
South actor thalapathy vijay joins politics and he announces his new political party see the details

मोठा निर्णय! अभिनय क्षेत्राला रामराम करत थलपती विजयची राजकारणात एण्ट्री, स्वत:च्या पक्षाची केली स्थापना  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.