२०२४ हे वर्ष सुरु होऊन आता ४ दिवस झाले आहेत. अनेकांनी सरत्या वर्षाला आनंदात व जल्लोषात निरोप दिला. २०२३ हे वर्ष अनेकांसाठी खास होते. अनेक सेलिब्रेटीमंडळीही वर्षाअखेरीस सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याचे पहायला मिळाले. तर काही कलाकारांनी आपल्या कुटुंबासह घरी नवीन वर्ष साजरे केले. अशातच आता सोनम कपूरची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने पती आनंद आहुजाच्या आजारपणाबद्दल एक खुलासा केला आहे.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिच्या व पत्नीबरोबरच्या काही खास फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली तिने एक मोठी पोस्टदेखील लिहिली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “गेले वर्ष हे अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. आम्ही आता पालक झालो आहोत हे सत्य स्वीकारले आहे. आई होण्याने भरपूर आनंद तर मिळतोच, पण शिवाय अनेक अज्ञात भीतींनाही सामोरे जावे लागते. मी भावनिक, शारीरिकदृष्ट्या खूप बदलले आहे. घडणाऱ्या अनेक गोष्टी समजून घेणे आणि तया स्वीकारणे हा एक प्रवास आहे आणि हे समजून घेणे हे माझ्यासाठी नवीन होते.”
आणखी वाचा – ‘अॅनिमल’ नंतर नव्या भूमिकेत दिसणार रणबीर कपूर, रोहित शेट्टीबरोबर करणार काम, नवा लूक चर्चेत
सोनमने या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “माझा पती खूप आजारी पडला होता. त्याला नक्की काय झाले? हे डॉक्टरांनाही समजत नव्हते. नवऱ्याच्या आजारपणाचे ते तीन महिने माझ्यासाठी नरकासारखे होते. पण देवाच्या कृपेने व डॉ. सरीन यांच्या मेहनतीचे मला चांगले फळ मिळाले. आनंद (सोनमचा पती) आता पूर्णपणे बरा आहे. मी माझ्या पतीला त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सक्षम आहे. त्याचा व्यवसायही खूप वाढत आहे. गेले वर्ष माझ्या कुटुंब व मित्रांसमवेत वेळ घालवण्यासह अनेक गोष्टींनी आश्चर्यकारक तसेच समृद्ध करणारे होते.”
यापुढे सोनमने तिच्या भावना व्यक्त करत असे म्हटले आहे की, “मला आशा आहे की, एक दिवस हे जग समजून घेईल की युद्धाने काहीही साध्य होत नाही. या युद्धात ज्यांनी आपले जवळचे गमावले आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. देव त्यांना आधार देवो. जे लोक सत्तेत आहेत, ते राक्षसासारखे वागत आहेत.” तसेच यापुढे तिने “नवीन वर्ष सर्वांसाठी मंगलमय जावो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना खुप प्रेम.” असं म्हणत तिने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.