बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर विवाहबंधनात अडकली आहे. दोघांचे कोर्टात नोंदणी पद्धतीने लग्न पार पडले. गेले काही दिवस त्यांच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळत होती. अशातच काल (३ जानेवारी) रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नातील काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयरा-नुपूर यांच्या लग्नाला जवळचे कुटुंबीय, मित्रपरिवार व काही खास लोकांनी हजेरी लावली होती.
आयरा-नूपुर यांचे नोंदणीकृत लग्न पार पडल्यानंतर त्यांच्या लग्नाचा खास रिसेप्शन सोहळादेखील पार पडला. या रिसेप्शन सोहळ्याला अनेक पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर या रिसेप्शन सोहळ्यात आमिर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसह स्टेजवर उपस्थित होता. आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता, त्याचा मुलगा जुनैद खान उपस्थित होते. आमिरची दुसरी पत्नी किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद राव खान देखील या उत्सवात सहभागी झाले होतेयावेळी अमिरच्या एका कृतीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खानने किरण रावला किस केल्याचे पाहायला मिळाले. यापैकी एका व्हिडीओमध्ये आमिर किरणच्या दिशेने चालत आला आणि तो तिच्याशी काहीतरी बोलला. यानंतर त्याने तिच्या गालावर एक किस केल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. या खास रिसेप्शन सोहळ्यासाठी आमिरने क्रिम रंगाचा कुर्ता व त्यावर पांढऱ्या रंगाचा धोतर व गुलाबी रंगाचा फेटा परिधान केला होता. तर किरण रावने हिरव्या रंगाचा ड्रेस व त्यावर सोनेरी ओढणी घेतली होती. तर रिना दत्त म्हणजेच आयराच्या आईने पांढऱ्या व निळ्या रंगाचा सुंदर नक्षीकाम असलेला ड्रेस परिधान केला होता.
आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीची कमाई किती?, वर्षभरात कमावते इतके कोटी, स्वत:ची प्रॉपर्टी आहे अन्…
नूपुरने त्याच्या लग्नात काळ्या रंगाची बनियान व पांढऱ्या शॉर्ट्समध्ये घरापासून विवाहस्थळापर्यंत धावत जात हजेरी लावली होती तर आयराने लग्नात धोती चोली ड्रेस परिधान केला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयरा-नुपूर यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती आणि अखेर ही जोडी आता विवाहबंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं असून त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनही लवकरच होणार आहे.